🌟विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे ईव्हीएम हॅक करुन देतो अडीच कोटी रुपये द्या अशी मागणी.....!


🌟विधान परिषेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी जवानाला केली अटक🌟  

 ✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या काळात संभाजीनगरमधुन EVM  मशिन घोटाळ्यासंबधी  मोठी बातमी समोर आली आहे. ईव्हीएम मशीन हॅक करतो सांगून सैन्यात हवालदार असलेल्या व्यक्तीने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे तब्बल अडीच कोटी रुपयांची मागणी केली आहे.विधानपरिषेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांना आरोपीला अटक केली आहे. 

मारुती ढाकणे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. शहरातील गोल्डन हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला 1 लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मारुती ढाकणे हा सैन्यात हवालदार असून  डोक्यावर खूप कर्ज झाल्याने त्यांने असा फसवणुकीचा प्रयत्न केला आणि फसला.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

 अंबादास दानवे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की आरोपी मारोती ढाकणे मला पाच-सहा महिन्यांपासून फोन करत होता. मी ईव्हीएम मशीन हॅक करतो आणि त्यात चिप बसवून मतांची हेराफेरी करतो, असं तो सांगत होता. मात्र मला त्यावर विश्वास नव्हता. मला हे आधीपासून माहिती होतं त्यामुळे वारंवार मी त्याला टाळत होतो. आरोपीने माझ्याकडे अडीच कोटींची मागणी केली होती. याबाबत मी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांना आरोपीला अटक केली आहे, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

आरोपी मारुती ढाकणे आर्मीमध्ये  जवान आहे. जम्मू काश्मीरमध्ये त्याची सध्या पोस्टिंग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर खूप कर्ज झालं होतं. म्हणून त्याने थापा मारल्या आहेत, अशी माहिती छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली. ईव्हीएमबाबत त्याला कुठलेही ज्ञान नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे त्याने अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे, असे छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त मनोज लोहिया सांगितले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या