🌟हुजूर साहीब नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात करण्यात आला तात्पुरता बदल....!


🌟सचखंड एक्सप्रेसच्या मार्गातसुध्दा रेल्वे विभागाने सहा दिवसांसाठी तात्पुरता बदल केला आहे🌟

नांदेड (दि.०६ मे २०२४) : हुजूर साहीब नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेसच्या मार्गात उत्तर रेल्वे विभागाच्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या कालावधीसाठी बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उत्तर रेल्वे विभागाच्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या आंदोलनाचे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम उमटले असल्याने हुजूर साहीब नांदेड-अमृतसर-नांदेड या सचखंड एक्सप्रेसच्या मार्गातसुध्दा रेल्वे विभागाने सहा दिवसांसाठी तात्पुरता बदल केला आहे.

           उद्या ०७ मे २०२४ रोजी नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक १२७१४५ हुजूर साहिब नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस सकाळी ०९.३० ऐवजी दुपारी ०३.०० वाजता सुटणार आहे तर ०४.०० ते ०९.०० या दरम्यान नांदेड अमृतसर एक्सप्रेस जाखल,धुरी व लुधियाना मार्गे धावणार आहे. तर अमृतसर-नांदेड एक्सप्रेस लुधियाना,धुरी व जाखल मार्गे परतीचा प्रवास करणार आहे. नांदेड ते जम्मुतावी एक्सप्रेस १० मे २०२४ रोजी जाखल,धुरी आणि लुधियाना मार्गे धावणार आहे,अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या