🌟अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील निंबा येथील केशवराव देशमुख यांचे दुःखद निधन....!


🌟उद्या मंगळवार दि.१४ में रोजी निंबा येथे होणार अंत्यसंस्कार🌟

अकोला (दि.१३ मे २०२४) - बाळापूर तालूक्यात निंबा येथील वारकरी संप्रदायातील एक सेवाभावी,अध्यात्मवादी व्यक्तिमत्व श्री.केशवराव विठ्ठलराव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने अकोला येथील ओझोन हॉस्पिटल मध्ये आज दुपारी १.०० वाजता दु:खद निधन झाले. उद्या मंगळवारी  दि.१४ में रोजी सकाळी १० वाजता निंबा येथे त्यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत.

  निंबा प्रवेशव्दाराजवळील कृषी सेवा केन्द्राचे संचालक श्री अनंत देशमुख यांचे ते वडील व ग्रामपंचायत सदस्य श्री.गणेश देशमुख यांचे मोठे वडील होते.मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्ष होते.गावातील एक शांत,सज्जन व्यक्तिमत्व,भक्तिमार्ग आमच्या वाटेने आयुष्य घालवणारे एक चाकोरीबद्ध शेतकरी म्हणून ते समाजात परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलं,मुली सुना,नातवंडं असा बराच मोठा आप्त परिवार आहे......

सदाचारी स्व.केशवराव बाप्पूंचे निधन ही निंबा परिसरातील एक शोकग्रस्त दु:खद घटना आहे......


===========================

☝️ निधनवार्ता प्रकाशनार्थ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या