🌟पुर्णा शहरातील शासकीय धान्यापासून वंचितांना मिळाले हक्काचे रेशन कार्ड.....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाचा सुत्य उपक्रम🌟

पूर्णा : पुर्णा शहरातील दिव्यांग,विधवा,परितक्त्या,भटके विमुक्त, पारधी जमात व इतर गोरगरीब हे मागील अनेक वर्षापासून पूर्णा शहरात वास्तव्यास आहेत, परंतु यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसल्यामुळे यांना शासकीय धान्य मिळत नव्हते. खऱ्या अर्थाने गरीब असलेली गरजवंत कुटुंब या योजने पासून वंचित असेल तर हि शासकीय मोफत धान्य मिळण्याची योजना नेमकी कोणासाठी आहे हा प्रश्न निर्माण होतो. पूर्णा शहरातील असंख्य धन दांडगे नामधारी रेशनकार्डधारक यांना या योजनेचा लाभ मिळत होता परंतु खरे गरजवंत या योजनेपासून वंचित होते म्हणून पूर्णा शहरात वास्तव्यास असलेले भटके विमुक्त, पारधी, विधवा व दिव्यांगांचा सर्वे करून यांना शासकीय मोफत धान्य मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने पुढाकार घेतला. त्यांच्याकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे घेऊन पूर्णा शहरातील २० दिव्यांग, ९ विधवा व परितक्त्या, भटके विमुक्तांचे पारधी कुटुंबातील ९ कुटुंब तसेच इतर ४३ गोरगरीब रोज मजूरदार असे ८१ कुटुंबांचे  रेशन कार्ड बनवून वाटप प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के, शहर प्रमुख संजय वाघमारे, क्रांतीनगरच्या शाखाप्रमुख अकबरी बेगम सय्यद मुनीर व अली नगरचे शाखाप्रमुख अय्युब शब्बीर शहा यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मार्गदर्शन करतांना पूर्ण शहरात ज्या प्रकारे गरजवंत कुटुंबाच्या मोफत रेशन चा लढा उभा करून तो यशस्वी केला तसेच या पुढील लढा हा पूर्णा शहर आणि तालुक्यातील गरजवंत गोर गरीब कुटुंबाच्या हकाच्या घरकुलासाठी असेल असे जाहीर केले. यावेळी तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के व शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.ही सर्व राशन कार्ड पूर्णा शहरातील १५ शासकीय स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी संलग्न करून घेण्यात आली, प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे यांच्या  प्रयत्नाने पूर्णा शहरातील गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे राशन कार्ड मिळाले, त्यांना शासकीय मोफत धान्य सुद्धा मिळणार म्हणून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाला माऊली ढोणे, हसीना बेगम शेख मगदूम, मीरा पळसकर, तसलीम बेगम, पंचशीला खंदारे, रेणुका पवार, सिराजभई हुसेनसाब, एजाज, सलीम, रफिक शाहा, मुन्ना शेख, खलील बेग, नन्हूमिया, अफजल खान, रोशन पठाण, शेरखान, वाजिद खान, धर्मा भोसले, भगवान पुंडगे, वनटणकर, पांचाळ, तानाजी, गंगाधर गायकवाड ईत्यादी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या