🌟भोकर येथील श्री गणेश मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त प्रवचन व महाप्रसादाचे आयोजन....!


🌟या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे🌟 

✍️ मोहन चौकेकर 

चिखली :  येथून जवळच असलेल्या विदर्भ-मराठवाडा सरहद्द भोकर येथिल शिवगणेश संस्थान व गौरक्षण ट्रस्ट द्वारा स्थापित शिवगणेश गणपती मंदिरातील श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा आठव्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार दि.7 मे 2024 रोजी भव्य महोत्सव, प्रवचन व महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलेले आहे.

चिखली ते जाफ्राबाद रोडवर भोकरवाडीपासून 1 कि.मी. अंतरावर बुलढाणा-जालना जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या शिवगणेश गणपती मंदीर परिसरामध्ये मंगळवार दि.7 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता प.पु.गुरुदेव 1008 वेदांताचार्य आचार्य स्वामी श्री हरिचैतन्यजी महाराज यांचे प्रवचन व त्यानंतर दुपारी 11 ते 2 वाजेपर्यंत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवगणेश संस्थान व गौरक्षण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा युवासेनेचे बुलडाणा जिल्हा प्रमुख नंदु कर्‍हाडे व गणेशभक्तांनी केले आहे......

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या