🌟शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पुर्ण करावी....!


🌟वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवाहन🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- शासनाकडून विविध शासननिर्णयानुसार निधी प्राप्त झालेला आहे सदर निधी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करुन घेतल्याशिवाय जमा होत नाही. सदर प्रक्रिया प्रत्यक्ष पात्र लाभार्थी यांनी स्वतः महा ई सेवा केंद्र/सेतु कार्यालयामध्ये जावुन पुर्ण करुन घ्यावयाची आहे.

त्यामुळे वाशिम जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की, ज्या शेतकऱ्यांना (विशिष्ट क्रमांक) नंबर आलेले आहेत त्यांनी प्रलंबित असलेली ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी. याबाबत लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्याबाबत त्यांनी संबंधीत गावचे तलाठी, संबंधीत तालुक्याचे नैसर्गिक आपत्ती लिपीक व संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांचेशी संपर्क करावा असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या