🌟परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातल्या वडी येथील २८ वर्षीय युवकाने गळफाळ घेवून केली आत्महत्या....!


🌟या घटने संदर्भात पाथरी पोलिस स्थानकात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल🌟 

परभणी (दि.२९ एप्रिल) : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातल्या वडी येथील युवक विकास मायंदळे वय २८ वर्ष या युवकाने काल रविवार दि.२८ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळच्या सुमारास गफळास घेवून आत्महत्या केली. 

दरम्यान या घटने संदर्भात पाथरी पोलिस स्थानकात मयत विकास मायंदळे या युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा तिघा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मयत मायंदळे यांच्या पत्नीवर नाते गोत्यातील शिवा दिवटे हा वाईट नजर ठेवून होता त्यास एक महिला व मदन दिवटे हे दोघेजण प्रोत्साहन देत होते. या प्रकाराने विकास मायंदळे हा तरुण मानसिकदृष्ट्या हैराण झाला होता त्या त्रासास कंटाळूनच त्याने गळफास घेवून आत्महत्या केली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या