🌟पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर हल्ला करण्याचे कारण आले समोर🌟
धाराशिव (दि.०८ एप्रिल)– धाराशिव शहरातील बेंबळी रोड परिसरातील सिध्देश्वर बेकरीच्या लगत काही अंतरावर चार ते पाच जनांनी दि.०१ एप्रिल २०२४ रोजी अज्ञात कारणांमुळे पत्रकार रविंद्र केसकर यांची मोटार सायकल अडवून त्यांच्या डाव्या गालावर कोयत्याने वार करीत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती या प्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे यास अटक करण्यात आली असून पत्रकार केसकर यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचा सखोल तपास पोलिसांनी केला आहे.पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी धाराशिव शहर पोलिस स्थानकात गुरनं.१३९/२०२४ अंतर्गत कलम ३०७,३४१,१४३,१४७,१४८,१४९भादंवि प्रमाणे दि.०२ एप्रिल २०२४ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
याप्रकरणी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रीक विश्लेषणावरुन व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी नामे दत्तात्रय भरत नरसिंगे राहणार तांदुळजा ता.जि.लातुर, यास गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल सह तांदुळजा येथुन ताब्यात घेवून त्याच्या कडे गुन्ह्याच्या संदर्भात कौशल्य पुर्ण रितीने सखोल चौकशी केली असता त्यांने सदरचा गुन्हा इतर दोन साथीदार व गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार प्रेमकुमार सुखदेव बनसोडे राहणार शाहुनगर धाराशिव याच्या नियेजनानुसार केला असल्याचे सांगितल्याने प्रेमकुमार सुखदेव बनसोडे याचा शिराढोण पोलीस ठाणे यांच्या मदतीने शोध घेवून त्यास शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतीन जायफळ या गावातुन ताब्यातुन घेवून त्याच्या गुन्ह्या संदर्भात सखोल तपास केला असता त्यांने सदर गुन्हा हा त्याच्या साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे.
* पत्रकार रविंद्र केसकर यांच्यावर हल्ला करण्याचे कारण आले समोर :-
शहरातील शाहूनगर भागात राहणारा पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार सुखदेव बनसोडे वय २७ वर्ष हा सांगलीच्या विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत होता सात दिवसांची सुट्टी काढून बनसोडे हा गावी आला होता जवळच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर ०५ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळच्या सुमारास ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे याने मुलीला वह्या दाखविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या खोलीत नेऊन तुझ्यावर माझं प्रेम असल्याचे सांगत शरीरसंबंधांची मागणी केली मुलीने नकार दिला तेव्हा त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला होता.अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे यास दहा वर्षे सक्तमजुरी व एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी सन २०१७ मध्ये सुनावली होती ०७ वर्षे जेलची हवा खाल्यानंतर बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे हा तीन महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आला होता.
जेलच्या बाहेर आल्यापासून तो पत्रकार रविंद्र केसकर याच्यावर चिडून होता पीडित मुलगी ही रविंद्र केसकर यांच्या ओळखीची असून, केसकर यांच्या सांगण्यावरून पीडित मुलीने प्रेमकुमार बनसोडे याच्यावर केस केली असा त्याचा आरोप आहे. केसकरमुळे आपणास शिक्षा झाली नोकरी गेली असा आरोप बनसोडे याचा आहे यामुळे त्याने चिडून केसकर यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे....
0 टिप्पण्या