🌟पुर्णेतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाची मतदान जनजागृती रॅली संपन्न....!


🌟कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थ्यीनींनी केले मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर🌟 


पुर्णा (दि.१० एप्रिल) - पुर्णा शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वतीने आज बुधवार दि.१० एप्रिल रोजी सकाळी मतदान जनजागृती साठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती रॅली दरम्यान शाळेतील शिक्षक व विद्यार्थीनींच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील परिसरात तसेच शिवतिर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोरील परिसरात तसेच नवा मोंढा परिसरातील पिडीसीसी बँकेसमोर पथनाट्यसादरिकरण करण्यात आले.


यावेळी गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्याध्यापिका राऊत मॅडम यांनी नियोजन केले यावेळी शाळेच्या सर्व विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवला .रॅलीच्या यशस्वितेसाठी कातोरे मॅडम,ढवळे सर,विशाल कांबळे,उत्तम भालेराव यांनी प्रयत्न केले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मतदान जनजागृती रॅलीत सहभागी शिक्षक विद्यार्थीनींना शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा कैलास भुवनचे मालक ओझा यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या