🌟परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे तालुकास्तरीय महिला आर्थिक विकास महामंडळाचे विक्री प्रदर्शन सुरु....!


🌟कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले🌟


परभणी (दि.06 मार्च) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) परभणी यांच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तेजस्विनी  महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास  प्रकल्प अंतर्गत एकता लोकसंचलित साधन केंद्र जिंतूर स्थापित स्वयंसहायता महिला  बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे व वस्तूचे भव्य विक्री प्रदर्शनाचे आज जिल्हा परिषद शाळा मैदान जिंतूर येथे नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शन 2024 चे आयोजन  करण्यात आले आहे.  


कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला नाबार्डचे सहायक महाप्रबंधक सुनिल नवसारे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुरेश पवार, मुख्यमंत्री कार्यालयाचे अविनाश सामाले, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवराज केंद्रे, सहायक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग अ. ए.चौधरी,  गट शिक्षण अधिकारी टी.एस. पोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत बामणे, जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, डॉ. विद्या चौधरी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

चालू आर्थिक वर्षात 46 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून,  प्रातिनिधिक स्वरूपात 7 बचत गटांना धनादेश वितरण करण्यात आले. यावेळी यशस्वी उद्योजक महिलांचा आणि जिल्ह्यातील 8 लोक संचलित साधन केंद्राचे सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब झिंजाडे यांनी केले सूत्रसंचलन जयश्री टेहरे यांनी केले तर आभार भावना कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवराज राउत, विनय कुंभार व एकता लोक संचलित साधन केंद्रातील सर्व स्टाफ व सर्व व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या