🌟प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुलाचा पहिला हप्ता वितरीत🌟
फुलचंद भगत
वाशिम :-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच (दि. 28) यवतमाळ येथे आले असतांना त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील एकुण ८ हजार ३३९ लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल योजनेचा पहिला हप्ता (ऑनलाईन पध्दतीने) लाभार्थ्यांच्या खात्यात वितरीत करण्यात आला. त्यामुळे या घरकुलाच्या बांधकामांना सुरुवात झाली असुन ती लवकरच पूर्ण करण्यासाठी व लोकांना हक्काचे घर देण्यासाठी जि. प. चे सीईओ वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांच्यासह जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेची संपूर्ण टिम मेहनत घेत आहे.
“सर्वांसाठी घरे २०२४" हे राज्य शासनाचे धोरण असून त्यानुसार बेघर तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळवुन देण्यासाठी जिल्हाभर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील बेघरांना घरकूल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत भूमिहीन लाभाथ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना तसेच निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमणे नियमानुकूल करणे, शासकिय जमिनी विनामुल्य उपलब्ध करुन देणे इत्यादी उपक्रमजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) यांच्यासाठी मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. मोदी आवास घरकुल योजनेकरीता जिल्हयासाठी उद्दिष्ट प्राप्त झालेले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
“जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या माध्यमातुन मोदी आवास घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी, त्यांचे अधिनस्त संपर्क अधिकारी, विस्तार अधिकारी, सर्व ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (आरएचइ) यांचे मार्फत यशस्वीपणे कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.“
-किरण गणेश कोवे, प्रकल्प संचालक,डीआरडीए
“जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी मोदी आवास योजनेसह इतरही घरकुल योजनांचा लाभ घेऊन आपले घर बांधुन पूर्ण करुन घ्यावे. जिल्ह्यातील एकही लाभार्थी घरकुलापासुन वंचित राहु नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात असुन याबाबत काहीही अडचण आल्यास जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेशी संपर्क करावा.“
– वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वाशिम
“जिल्हयात मोदी आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील ८३३९ लाभार्थ्यांना मोदी आवास योजनेचा पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. ही कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी सर्व लोकप्रतिधिंनी पाठपुरावा करावा.”
-चंद्रकांत ठाकरे, अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम
दि.१५ ते २५ फेब्रुवारी दरम्यान राबविली मोहिम :-
मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रकल्प संचाल किरण कोवे यांच्या नेतृत्वात दि. १५ ते २५ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये मोदी आवास योजनेसह प्रधानमंत्री आवास योजना, रमाई तसेच शबरी आवास योजनांचा समावेश होता. या योजनेमधील मंजूर घरकुलांना जलद गतीने पुर्ण करण्याकरीता “सुक्ष्म नियोजन व तात्काळ अमलबजावणी” हे सुत्र लावण्यात आले होते. याचा चांगला परिणाम पाहावयास मिळाला असल्याचे निरिक्षण प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी नोंदविले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या