🌟परभणी जिल्ह्यातील लक्ष्मणनगर,गौंडगाव आणि धारासूर येथील डेपो वाळू विक्रीसाठी सुरू....!


🌟जास्तीत-जास्त जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे🌟

परभणी (दि.०१ फेब्रुवारी) : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार शासनामार्फत वाळू रेती उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्रीबाबतच्या सर्वकष धोरणानुसार नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दराने उपलब्ध करुन देणे तसेच अनाधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने उत्खनन,साठवणूक व विक्री व्यवस्थापन करण्यासाठी हे धोरण जाहीर केले आहे.

पुर्णा तालुक्यातील लक्ष्मणनगर आणि गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव, धारासूर अशा तीन ठिकाणी सुरू असलेल्या गाळमिश्रीत वाळू डेपोसाठी शासन निर्णय दि. १६.०२.२०२४ मधील सर्व अटी व शर्ती लागू करण्यात आल्या असून, शासन निर्णयातील निर्देशानुसार गाळमिश्रीत वाळू डेपोवरून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे विक्री दर  विविध बाबींचा समावेश करून ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येत आहे. येथील वाळू विकत घेण्यासाठी विभागाच्या (mahakhanij.maharashtra.gov.in) महाखनिज डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. 

शासन निर्णयातील तरतुदीनुसार वाळू डेपो कार्यान्वित झाले असून, वाळू डेपो तसेच सुरु राहतील तथापि, हे वाळू डेपोसाठी या सुधारीत धोरणातील अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शासन निर्णयाच्या दिनांकापासून या सुधारीत धोरणातील प्रकरण क्रमांक सहा (III) मधील वाळू / रेती विक्रीची किंमत आकारण्यात यावी, असे नमूद केले आहे. ही बा

            नदीतून वाळूचे उत्खनन, वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपोनिर्मिती व व्यवस्थापन यासाठी संबंधीत जिल्ह्यातील डेपोनिहाय प्रसिद्ध करण्यात येणा-या निविदेमध्ये प्राप्त होणारा निविदेतील अंतिम दर. (GST सह), स्वामित्वधनाची रक्कम, शासनामार्फत आकारण्यात येणारा जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी, पर्यावरण शुल्क व नियमानुसार अनुज्ञेय शुल्क कर इत्यादी, वाळू डेपोतून वाळू वाहतूकीचा खर्च ग्राहकांना करावा लागेल. 

वरीलप्रमाणे दर आकारून गाळमिश्रीत वाळू डेपोत उपलब्ध होणाऱ्या गाळमिश्रीत वाळूच्या प्रमाणात ऑनलाईन प्रणालीवरून गाळमिश्रीत वाळू विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी जनतेने खालीलप्रमाणे ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानुसार जास्तीत-जास्त जनतेने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे..... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या