🌟विश्व एप्रिल फुल डे विशेष : मूर्खांच्या बाजारात मूर्खांचा थयथयाट.....!


🌟या दिवशी गमतीने एखाद्यास मूर्ख बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते🌟

या दिवशी लोक एकमेकांसोबत विनोद, मस्ती करतात, चेष्टा करतात. आजकाल लोक सोशल मीडियाच्या मदतीने या दिवसाचा खूप आनंद घेतात. मित्र, नातेवाईकांना 'एप्रिल फुल्स डे'वर मजेदार मीम्स, जोक्स आणि शायरी पाठवतात. मात्र आपण एप्रिल फुल्स डे साजरा करण्यामागचं कारण माहिती करून घेण्यासाठी श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींचा सदर संकलित लेख जरूर वाचा... संपादक.

         एप्रिल फूल दिन हा एप्रिल महिन्याचा पहिला दिवस होय. या दिवशी गमतीने एखाद्यास मूर्ख बनविण्याची प्रथा पाश्चिमात्य राष्ट्रांत प्रामुख्याने दिसून येते. मूर्ख बनलेल्या व्यक्तीस एप्रिल फूल म्हणण्याचा प्रघात आहे. या प्रथेची सुरुवात केव्हा व कशी झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि काही लोक तिचा संबंध प्राचीन रोममधील व्हीनस व फॉर्चुना व्हिरिलीस या देवतांच्या उत्सवाशी लावतात. ग्रेगोरियन पंचांग १५६४ साली स्वीकारल्यानंतर फ्रान्समध्ये या प्रथेस सुरुवात झाली व ती १६०० पर्यंत इतरत्र पसरली असेही म्हटले जाते. काही लोक त्यास लूच्या वसंतोत्सवाची स्मृती मानतात. प्राचीन रोममधील हिलेरिया व भारतातील होळी या उत्संवाशी या एप्रिल फूलचे बरेच साम्य आहे. होळी व हिलेरिया यांच्याप्रमाणेच हा प्रकार वसंतागमनाच्या वेळीच साजरा करतात. मेक्सिकोत २८ डिसेंबरला हा दिवस पाळतात. त्या दिवशी उसनी घेतलेली वस्तू परत न करण्याची तेथे प्रथा आहे. मूर्ख बनलेल्या व्यक्तीस इंग्‍लंडमध्ये एप्रिल फूल, स्कॉटलंडमध्ये एप्रिल गॉक व फ्रान्समध्ये एप्रिल फिश म्हणतात. ब्रिटिशांच्या अंमलाबरोबर ही प्रथा भारतात आली. या दिवसास सकल मूर्खांचा दिवस असेही म्हणतात. खेड्यात एक म्हण प्रचलित आहे, की "कामधंदा सोडून घुबडाला फासे मांडा" यासारखा हा प्रकार आहे. 

         हा दिवस अनेक देशांमध्ये १ एप्रिलला साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात. याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो. एप्रिल फूल साजरा करण्याची सुरूवात फ्रान्समधून झाली असे म्हटले जाते. पॉप ग्रेगरी १३ यांनी १५८२ साली प्रत्येक युरोपियन देशाला ज्यूलियन कॅलेंडर सोडून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्याचे निर्देश दिले. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये नवे वर्षे हे १ एप्रिलपासून नाही तर १ जानेवारीपासून सुरू होतं. अनेक लोकांनी हे मानण्यास नकार दिला तर काहींना याबद्दल माहितीही नव्हती. यामुळे ते नववर्ष १ एप्रिललाच साजरे करतात. अशांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले. यादिवशी प्रॅंक करून एकमेकांना मुर्ख बनवू लागले. बघता बघता ही प्रथा युरोपमध्ये पसरली. या दिवशी लोक एकमेकांसोबत विनोद, मस्ती करतात, चेष्टा करतात. मूर्ख कोण असतो? इतरांना मूर्ख बनवितो, खरेतर तोच खरा मूर्ख असतो. आजकाल लोक सोशल मीडियाच्या मदतीने या दिवसाचा खूप आनंद घेतात. मित्र, नातेवाईकांना "एप्रिल फुल्स डे" वर मजेदार मीम्स, जोक्स आणि शायरी पाठवतात. मात्र तुम्हाला एप्रिल फुल्स डे साजरा करण्यामागचं कारण माहिती आहे का? एप्रिल फुल डे साजरा करण्यामागे दोन कथा प्रचलित आहेत. एप्रिल फुल डे मागची पहिली प्रचलित कथा-

            इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमियाची राणी अॅनी यांनी ३२ मार्च १३८१ रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली. लग्नाच्या बातमीने जनतेमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, कॅलेंडरमध्ये ३२ मार्च ही तारीख नसते. राजा-राणीने लग्नाची खोटी माहिती देऊन लोकांना मूर्ख बनवले होते, तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. ३२ मार्च हा दिवस नाही म्हणून १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात आला. 

           यामागची दुसरी कथा अशी आहे की, फ्रान्समध्ये १५८२ मध्ये पोप चार्ल्स यांनी जुन्या कॅलेंडरच्या जागी नवीन रोमन कॅलेंडर सुरू केले. मात्र, त्यानंतरही काही लोक जुन्या तारखेनुसार नवीन वर्ष साजरे करत होते. त्यामुळे जुन्या कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणाऱ्यांना एप्रिल फूल म्हटले गेले. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा करण्यात आल्याचं सांगितलं जातं. एखाद्याचा वेळ, पैसा आणि बुद्धी व्यर्थ खर्ची पाडून वेड्यात काढणे, हे शहाण्यांना शोभते का? विचारमंथन अवश्यच व्हावे.

!! कुणालाही मूर्ख बनविणे कदापिही योग्य नाही,एखाद्याच्या नजरेतून आपण कधीही उतरून नये !!

      - संकलन व सुलेखन -

                     श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                      रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                      फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या