🌟पुर्णा-नांंदेड/पुर्णा-ताडकळस राज्यमार्ग आणखी किती बळी घेणार ? चार दिवसांत दोन अपघात दोन तरुणांचा मृत्यू.....!


🌟अपघातांच्या मालिकेला पुर्णविराम मिळणार तरी केव्हा ? ट्रॅक्टरांच्या धडकेत तीन दिवसांत दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू🌟 

पुर्णा (विशेष वृत्त) - पुर्णा-ताडकळस व पुर्णा-नांदेड राज्य मार्गांवरील अपघातांच्या मालिकांना शेवटी पुर्णविराम मिळणार तरी केंव्हा ? असा हृदयविदारक प्रश्न उपस्थित करणाऱ्या भयंकर अपघातांच्या दोन घटना दि.१४ मार्च ते दि.१७ मार्च २०२४ या तीन दिवसांच्या कालावधीत घडल्यामुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून दि.१४ मार्च २०२४ रोजी रात्री १०-३० ते ११-०० वाजेच्या सुमारास पुर्णा-ताडकळस राज्यमार्गावरील बळीराजा साखर कारखाना लगत उसाने भरलेले ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी उभा टाकलेल्या २७ वर्षीय विजय लिंबाजी जाधव या युवकाला चिरडल्याची भयंकर घटना ताजीच असतांना अवघ्या तीसऱ्या दिवशी दि.१७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०६-०० वाजेच्या सुमारास या बळीराजा कारखाना परिसरातच महागाव येथून नातेवाईकांना भेटून आई व भाच्यासह मोटरसायकल वरुन पुर्णेतील आपल्या सिध्दार्थ नगर येथील घराकडे जात असलेल्या २५ वर्षीय राजु सिताराम देवरे यांच्या दुचाकीला ट्रॅक्टर चालकाने उडवल्याची गंभीर भयंकर घटना घडली या घटनेत राजु सिताराम देवरे यांच्यासह त्यांची आई बेबी सिताराम देवरे वय ५० वर्ष व आदित्य नितीन जोंधळे वय ०४ वर्ष हे गंभीर जखमी झाले राजु सिताराम देवरे हे गंभीर जखमी झाल्याने शासकीय ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ नांदेड येथे हलवले उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली त्यामुळे या पुर्णा-ताडकळस राज्यमार्गाने तिन दिवसांत दोन निष्पाप युवकांचा बळी घेतल्याने संतापासह हळहळ देखील व्यक्त होत आहे.

दरम्यान पुर्णा-ताडकळस व पुर्णा-नांदेड या राज्यमार्गांवर गौण खनिज वाळू,दगड खडी,माती,मुरुम वाहतूक करणाऱ्या तसेच बळीराजा साखर कारखान्यासाठी वाहन चालकांनी अक्षरशः उच्छाद मांडल्याचे निदर्शनास येत असून सदरील कालबाह्य झालेल्या वाहनांना ज्यात कृषी उपयोगी वाहन ट्रॅक्टर ट्राली,टिप्पर,हायला,ट्रक, आदी जड वाहनांना एकतर कुठलाही नंबर नसतो याशिवाय पालकांकडे अधिकृत वाहतूकीचे लायसन्स नसते त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या मार्गांवर अगदी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या देशी/विदेशी दारुमुळे वाहन चालक फुल नशेत असतात त्यामुळे वाहन चालवतांना त्यांना कुठलेही भान नसते अशा परिस्थितीत अपघात होणार नाही तर काय ? या भयंकर अपघातांच्या मालिकांचा ज्याप्रमाणे बेजबाबदार वाहन चालक जबाबदार आहेत त्याहीपेक्षा जास्त जबाबदार प्रथमतः परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी/कर्मचारी व परभणी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी/कर्मचारी देखील जबाबदार आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही तीन दिवसांत झालेल्या दोन भयंकर अपघातांच्या घटनेत मृत्यू पावलेल्या विजय लिंबाजी जाधव वय २७ वर्ष राहणार छत्रपती शिवाजी महाराज नगर (कदम गल्ली) पुर्णा व राजु सिताराम देवरे वय २५ वर्ष राहणार सिध्दार्थ नगर पुर्णा या निष्पाप युवकांच्या अपघाती मृत्यूस संबंधित वाहन चालक जसे जवाबदार आहेत तसेच कर्तव्याचे भान विसरलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा बेजबाबदारपा देखील जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा असे स्पष्ट मत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे.

पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील कालबाह्य नंबरप्लेट अदृश्य वाहनांच्या जप्तीसह विदाऊट लायसन्स वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून जोपर्यंत कठोरात कठोर कारवाई होत नाही तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जोपर्यंत राज्य मार्गांसह महामार्गांवरील खानावळीच्या नावावर चालणाऱ्या धाब्यांतून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध देशी/विदेशी दारू विक्री विरोधात कठोरात कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत अपघातांची मालिका काही केल्या थांबणार नसल्याचे आता स्पष्ट होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या