🌟'जगात जर्मनी भारतात परभणी' ऐकावे ते नवलच...बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी चक्क तलावातील गाळाचा वापर ?


🌟परभणी जिल्ह्याचे माजी खासदार सुरेश जाधव यांची जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार🌟

परभणी (दि.२८ मार्च) : 'जगात जर्मनी भारतात परभणी' ऐकावे ते नवलच....परभणी महानगराच्या बाह्यवळण रस्त्याच्या कामात परभणी तालुक्यातील मौजे जांब येथील तलावातून उपसलेला गाळ मोठ्या प्रमाणावर वापरला जात असल्याचा गंभीर आरोप परभणी जिल्ह्याचे माजी खासदार अ‍ॅड.सुरेश जाधव पाटील यांनी केला असून रस्त्याच्या कामासाठी चक्क तलावातील गाळाचा वापर करण्यात आल्याने विकासाच्या नावाखाली संपूर्ण जिल्हा भकास केल्यानंतर देखील भकासूरी प्रवृत्ती सुधारत नसल्याने जनसामान्यांत तीव्र असंतोष पसरला आहे.

           बाह्यवळण रस्त्याच्या कामांकरीता संबंधित एजन्सीधारकाने जांबच्या तलावातून मोठ्या प्रमाणावर मृत गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले  आहे. तेथील तो गाळ बाह्यवळण रस्त्याच्या कामासाठी वापरला जात आहे, वास्तविकतः या वळण रस्त्याच्या कामांमधून मृत गाळ टाकण्यासह अंथरण्याचे कोणतेही प्रयोजन नाही, असे असतांना संबंधित कंत्राटदार कंपनीने शेकडो टिप्पर गाळ टाकून उखळ पांढरे करण्याचे प्रकार सुरु केले आहेत. या तलावातून काळी माती, लाल गिरो माती, पांढरी गिरो माती शेकडो टिप्पर काढून वळण रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी वापरली जात आहे. या खूलेआम प्रकारा विरोधात तक्रारी करुनही उपयोग होत नाही. संबंधित कंपनीने काहींना हाताशी धरुन या प्रकरणात पध्दतशीरपणे गाळ उपसण्यासह ते वापरण्याचे काम सुरुच ठेवले आहे. वास्तविकतः महामार्गाच्या निकषानूसार अशा पध्दतीचा मृत गाळ मजबुतीकरणाच्या कामात वापरणेच पूर्णतः बेकायदेशीर आहे, त्यामुळे संबंधितांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी आणि गाळ हडप करणार्‍या व्यक्तींविरोधात मोठी मोहिम राबवावी, असे आवाहन माजी खासदार जाधव यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या