🌟पुर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...!


🌟यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी अभिवादन केले 🌟

पूर्णा (जं.) प्रतिनिधी - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात दिनांक १२ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

  महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा. डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले.

याप्रसंगी महाविद्यालयातील  प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 

या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या