🌟भाडे तत्वावर इमारतीसाठी संपर्क करण्याचे आवाहन🌟
परभणी (दि. 6 फेब्रुवारी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुलां- मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना लागू केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये व त्यांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा, या दृष्टिकोणातून जिल्ह्यातील गंगाखेड, सोनपेठ व पालम या तीन तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी 100 मुले व मुलींसाठी प्रत्येकी एक असे एकूण प्रत्येकी 2 याप्रमाणे तीन तालुक्यातील सहा स्वतंत्र इमारतींची आवश्यकता आहे. तरी या प्रकारच्या सोयीसुविधा असलेल्या इमारत मालकांनी आधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, परभणी येथील समाज कल्याण निरीक्षक ए.एम. श्रीमनवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे.....
*****
0 टिप्पण्या