🌟नांदेडसह संपूर्ण हुजूरी सिख समुदाय व सिख आंदोलनकर्त्यांचा आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा🌟
नांदेड (दि.२७ फेब्रुवारी) - केंद्र व राज्य शासनातर्फे गुरुद्वारा बोर्ड अधिनियम विरोधातील आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षांना भूमिका आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांमध्ये धडा शिकविण्यासाठी शिख समाज मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा मनबीरसिंघ ग्रंथी यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
राज्य सरकारने गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 संमत केला असून त्या विरोधामध्ये मागील 19 दिवसापासून शिख बांधव आंदोलन करत आहेत. त्यास शासन व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज साखळी उपोषणामध्ये बाबा फत्तेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी,स.जसपालसिंघ लांगरी,स.जसबीरसिघ बुंगई,जगजीतसिंघ खालसा,मनप्रीतसिंघ कारागीर, बक्षीसिंघ पुजारी प्रेमजीतसिंघ शिलेदार, दीपकसिंघ हजुरिया यांनी उपोषण केले.
सत्ताधारी पक्षांच्यावतीने गुरुद्वारा बोर्ड अधिनियम विरोधातील शिख बांधवांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून गोलमाल उत्तरे देऊन आंदोलन थांबविण्याची दिलेल्या पत्रांवर आंदोलनकर्त्यांनी अविश्वास दाखवीत आंदोलन सुरूच ठेवण्याचा असल्याचा मनोदय व्यक्त केला.
साखळी उपोषणाच्या 19 व्या दिवसी सुरु असलेल्या आंदोलनामध्ये बंदीछोडसिंघ खालसा, रवींद्रसिंघ बुंगई, जसपालसिंघ लांगरी, रवींद्रसिंघ पुजारी, जगदीपसिंघ नंबरदार, दीपकसिंघ हजुरिया, गुरुदेवसिंघ रामगडीया ,भोलासिंघ गाडीवाले, राजसिंघ रामगडिया वीरेंद्रसिंघबेदी, करणपालसिंघ लोणीवाले, हॅपीसिंघ शिलेदार, प्रेमज्योतसिंग सुखोई, यांच्यासह शेकडो आंदोलकांनी आज सहभाग घेतला.....
0 टिप्पण्या