🌟वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस,गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.....!


🌟नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी🌟                    

फुलचंद भगत

वाशिम : कारंजा तालुक्यासह वाशिम संपूर्ण जिल्ह्यात दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री अचानक झालेल्या अवकाळी पाऊस,गारपीट व वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या गहू,हरबरा, भाजीपाला व फळबागचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे,या बाबीची दाखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसुफ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २७ फेब्रुवारी रोजी कारंजा तहसीलदार यांचे मार्फत वाशिम जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संपूर्ण जिल्ह्यासह कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्यासह शासनाकडून भरीव स्वरूपाची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी राकापा अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख,वाशिम जिल्हा नियोजन समिती सदस्य हमीद शेख,नगरसेवक सलीम गारवे,सलीम प्यारेवाले,राकापा जिल्हा कार्यकारिणी सदस्य फारूक अली,मो अकबर मो अफजल,चांद प्यारेवाले, राजू खान,अ सलाम अ मन्नान,अ एजाज अ मन्नान,सलीम गुंगीवाले,रमजान बंदुकवाले,जगदीश भोजने, सुनील अवताळे, रहेमत बेग,नबी शाह,रामदास इंगोले, कय्युम जट्टावाले,मिर्झा तौकिर बेग,शकील नौरंगाबादी,मो असीम,अ सईद,मो आरिफ मौलाना व तुषार बनसोड आदी सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या