🌟वाशिम येथे राज्यस्तरीय उष्मालाट कार्यशाळा २०२४ पूर्वतयारी व सौम्यीकरण व्यवस्थापन.....!


🌟कार्यशाळेच्या समारोपाला आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रालयाचे संचालक आप्पासाहेब धुळाज यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 


✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा प्रशासन जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

            दिनांक ८ व ९ फेब्रुवारी २०२४ स्थळ :- सिनेट सभागृह,कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव.दिनांक ९/०२/२०२४ रोजी मा. ना. अनिल भाईदास पाटील साहेब मंत्री, मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते सास पॅटर्न कारंजा व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांचे विशेष कार्य केल्याबद्दल सर्वधर्म मित्र मंडळ अध्यक्ष श्री श्याम सवाई व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांचा बुके देऊन सत्कार कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात करण्यात आला.राज्यातील १५ जिल्हे दोन दिवसीय उष्मालाट कार्यशाळेत सहभागी झाले होते.सदर कार्यशाळेत उष्मालाट संदर्भात उत्कृषटरित्या सादरीकरण करण्यात आले.

सदर दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. श्री. आप्पासाहेब धुळाज सर संचालक आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्रालय मुंबई, मा श्री अनिल कांबळे उपमहा निर्देशक प्रादेशिक मौसम विज्ञान केंद्र, मुंबई, मा श्री दुफारे सर अवर सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय मुंबई व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.सदर कार्यशाळेला महसूल विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, पशू संवर्धन विभाग, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सामाजिक सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती राज्यस्तरीय उष्मालाट कार्यशाळा २०२४ या कार्यशाळमध्ये मा मंत्री महोदय यांनी सास कंट्रोल रूम कारंजा वन सेकंद वन कॉल न्यु लाईफ अभियान या संदर्भात भूमिका जमजाऊन घेतली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या