🌟सरकारने लादलेल्या गुरुद्वारा अधिनियम २०२४ या काळ्या कायद्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण🌟
🌟आज चक्री उपोषणाचा दुसरा दिवस : सरकारने लादलेल्या काळ्या कायद्या विरोधात तीव्र पडसाद🌟
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरुद्वारा ॲक्ट १९५६ या कायद्यात संशोधन करुन केलेला नवीन गुरुद्वारा अधिनियम २०२४ हा कायदा स्थानिक हुजरी सिख समुदायाच्या धार्मिक अधिकार व मुलभूत पारंपरिक हक्कांवर गधा आणणारा असल्यामुळे स्थानिक सिख समुदायामध्ये या नवीन कायद्या विरोधात प्रचंड रोषासह असुरक्षितेची भावना निर्माण झाली असल्यामुळे काल शुक्रवार दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२-०० वाजेच्या सुमारास सिख समुदायाच्या वतीने या काळ्या कायद्याला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य जाहीर विरोध मोर्चा काढण्यात आला होता सदरील मोर्चात सिख समुदायाने प्रचंड संख्येने सहभाग नोंदवून काळ्या कायद्यासह सरकार विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केल्याने हा जाहीर विरोध मोर्चा ऐतिहासिक ठरला.
सिख समुदायाच्या वतीने नवीन गुरुद्वारा अधिनियम २०२४ हा काळा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी काल शुक्रवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर जाहीर विरोध मोर्चासह जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने व चक्री उपोषणाचा देखील सुरुवात केली असून या निदर्शन व चक्री उपोषणाला आज शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी दुसरा दिवस असून सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव सरदार रविंदरसिंघ बुंगई यांच्यासह सरदार गुरुदेवसिंघ रामगडीया, सरदार हरमीतसिंघ सुखई,सरदार राजुसिंघ कथरीया आदी उपोषणार्थींनी आज उपोषणाला सुरुवात केली होती यावेळी त्यांना स.मनप्रीतसिंघ कुंजीवाले,स.गुरमीतसिंघ महाजनस.महेंद्रसिंघ पेडल,स.जसपालसिंघ लांगरी,स.रवींद्रसिंघ पुजारी,स.रवींद्रसिंघ पुजारी,स.भागिंदरसिंघ घाडीसाज,मनबीरसिंघ ग्रंथी,स.किरपालसिंग हजुरिया,स.राजसिंघ रामगडिया,स.बलबीरसिंघ बुंगई,स.तेजपाल सिंघ बादशाह,स.बलजीतसिंघ बावरी,स.गुरदेवसिंघ शिकारघाट,स.हरभजन सिंघ दिगवा,स.मनप्रीतसिंघ कारागीर,स.गुरमीतसिंघ बेदी आदींनी सक्रिय सहभाग नोंदवत चक्री उपोषणाला पाठिंबा दिला.....
0 टिप्पण्या