🌟या कार्यशाळेचे उदघाटन ०६ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता ज्येष्ठ साहित्यिक व कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते होणार🌟
पूर्णा (दि.०२ फेब्रुवारी) - पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून शासनमान्य मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघ व स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी विभागीय ग्रंथालय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन सकाळी ११:०० वाजता ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे माजी आमदार गंगाधर पटणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, पूर्णा येथील भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो व माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार, प्राचार्य डॉ. नंदकुमार दहीभाते, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे, सहाय्यक ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजीनगरचे सुनील हुसे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे माहिती व ज्ञानस्त्रोत केंद्राचे माजी संचालक डाॅ. धर्मराज वीर, मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले, परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्कर पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असून उदघाटन सत्रात सार्वजनिक ग्रंथालय चळवळीतील कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या नावे देण्यात येणाऱ्या पाच पुरस्काराचे मान्यवरांचे हस्ते वितरणही करण्यात येईल.
उदघाटन सत्रानंतर " सार्वजनिक ग्रंथालयाचे ऑनलाईन अंकेशन व वार्षिक अहवाल" या विषयावर होणाऱ्या पहिल्या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष खंडेराव सरनाईक हे राहणार आहेत तर मार्गदर्शक म्हणून परभणी जिल्हा ग्रंथालय माहिती अधिकारी अशोक ढोक, ग्रंथपाल डॉ. विलास काळे, परभणी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव जीवन लोखंडे, परभणीचे ग्रंथालय निरीक्षक बाळासाहेब देवणे,
" ग्रंथालयातील अद्यावत व आधुनिक प्रणालीच्या करावयाची विविध कार्य " या विषयावर होणाऱ्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी राहतील तर वक्ते म्हणून प्रा.डॉ.अशोक कोलंबीकर, मराठवाडा ग्रंथालय संघाचे कार्यवाह संतोष ससे, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष युवराज जाधव, बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुधीर चाटे.
" सार्वजनिक ग्रंथालया पुढील आव्हाणे " या विषयावर होणाऱ्या तिसऱ्या सत्राचे अध्यक्ष बीड जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह नरहरी मंठेकर तर वक्ते म्हणून मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे उपकार्याध्यक्ष अरविंद लंके, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे, नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक राजेंद्र हंबीरे,जालना येथील राजाराम चव्हाण व श्याम सेलगावकर हे उपस्थित राहतील. समारोप सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राम मेकले तर प्रमुख पाहुणे मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र सानप, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष राम मोतीपवळे, हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक डॉ. नामदेव दळवी, धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ज्ञानेश्वर पाटील, सहाय्यक ग्रंथालय संचालक कार्यालयाचे अधिक्षक अध्यक्ष अनिल बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित राहतील.
या मराठवाडास्तरीय ग्रंथालय कार्यशाळेत मराठवाड्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे अध्यक्ष गुलाबराव कदम, प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, सहसचिव अविनाश कोठाळे, डॉ. वसंत पवार. दत्तात्रय पवार व अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ परभणी व स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा (जं.) जि. परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे....
0 टिप्पण्या