🌟पुर्णेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी....!


🌟शिव जन्मोत्सव मिरवणूकीतील छ.शिवाजी महाराज व घोडेस्वार मावळ्यांच्या सजिव देखाव्यांसह लेझीम पथकाने वेधले लक्ष🌟


पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - पुर्णा शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज सोमवार दि.१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत बहुजन प्रतिपालक 'जनता राजा' छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील महादेव मंदिर देवस्थान येथून सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शहरातील व्यापारी प्रतिष्ठीत नागरिक प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करुन भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.

यावेळी शिवजन्मोत्सव मिरवणूकीत उंटासह छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी सोबत अष्टप्रधान मंडळ व घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह मावळ्यांचा देखील सजिव देखावा सादर करण्यात आला होता या भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूकीत आदर्श व्यक्तिमत्व तथा शिक्षक श्री बंडू गायकवाड सर यांनी उभारलेल्या पंचशील नाट्य ग्रुप मधील मुलींच्या लेझीम पथकाने सर्वांनाच आकर्षित केले ढोल ताशांसह डिजेच्या गजरात सुरू झालेली मिरवणूक शहरातील अंबानगरी श्री गुरु बुध्दीस्वामी मठ परिसर शुरवीर महाराणा प्रतापसिंह चौक श्री दत्त मंदिर परिसर संत नरहरी महाराज चौक (डॉ जहागीर दार दवाखाना) या मार्गावरुन शिवतीर्थावरील पोहोचल्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले यानंतर पुर्ववत मिरवणुकीला सुरुवात झाली सदरील मिरवणूक महात्मा बसवेश्वर चौक परिसरात पोहोचल्यानंतर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा स्थळावरील प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.


यानंतर शिवजन्मोत्सव मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोहोचल्यानंतर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले मिरवणुकी दरम्यान शहरातील महापुरुषांना सन्मानपूर्वक अभिवादन करीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत निघालेली मिरवणूक महर्षी दयानंद सरस्वती चौक सराफा बाजार शहिद सरदार भगतसिंग चौक या मार्गावरुन मार्गक्रमण करीत छत्रपती शिवाजी महाराज नगरातील महादेव मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर तेथे शिवजन्मोत्सवासह छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली.

यावेळी आपला लाडका 'जानता राजा' तथा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी सर्वधर्मीय सर्व समाजातील शिवप्रेमी बांधव तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या