🌟गहाळ/स्टोलन झालेले एकुण 18 अँड्राईड मोबाईल किंमत 1,94,000 रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर : तक्रारदारांना त्यांचे मोबाईल केले परत🌟
✍🏻फुलचंद भगत
वाशिम :- सर्वसामाण्य नागरिकां करिता शासणाने गहाळ/स्टोलन मोबाईल शोध होणे करिता CEIR PORTAL कार्यान्वित केले आहे. जिल्ह्याचे स्तरावर सदर पोर्टलचे कामकाज हे मा.पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्ह्यात सुरु आहे. तसेच मंगरुळपीर उपविभागीय स्तरावर श्रीमती निलीमा आरज उपविभागीय पोलीस अधीकारी, मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनाखाली सदर पोर्टलचे कामकाज हे पोकाँ/88/ मंगेश सुरेश गादेकर पार पाडत आहेत मंगरुळपीर उपविभागातील पोलीस स्टेशन मंगरुळपीर, आसेगाव, अनसिंग, जऊळका येथील लोकांना सदर पोर्टल बाबत सजग करण्यात आले असुन संबंधीत पोलीस स्टेशनला दैनंदीन गहाळ झालेल्या मोबाईल बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर सदर गहाळ झालेले मोबाईल तक्रारदारा कडुन तक्रार नोंदवुन घेवुन सदर तक्रार ही सिईआयआर पोर्टलवर ऑनलाईन माहीती अपलोड केल्या जाते.
दिनांक 01/01/2024 ते दि. 14/02/2024 पावेतो मंगरुळपीर उपविभागातील पोलीस स्टेशन वरुन CEIR PORTAL वर मंगरुळपीर उपविभागा मधील गहाळ/स्टोलन झालेले मोबाईल अपलोड केलेल्या अर्जापैकी दिनांक 14/02/2024 पर्यंत एकुण 18 मोबाईल फोनचा ( किंमत 1,94,000 रु.चा मुद्देमाल ) पोर्टलद्वारे मिळालेल्या माहीती वरुन शोध घेण्यात आला व संबंधीतांकडुन ते मोबाईल फोन हस्तगत करुन मोबाईल मुळ मालक / तक्रारदार यांना उपविभागीय पोलीस अधीकारी निलीमा आरज मँडम यांचे हस्ते सदर मोबाईल परत करण्यात आले. सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक साहेब श्री अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री भारत तांगडे,श्रीमती निलीमा आरज उपविभागीय पोलीस अधीकारी, मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनाखाली एसडीपीओ कार्यालयमंगरुळपीर येथील पोकाँ/88/ मंगेश सुरेश गादेकर, पोकाँ/699/रमेश राऊत व सायबर सेल वाशिम येथील पोकाँ/982/ विजय गंगावणे यांचे पथकाद्वारे करण्यात आली. व हस्तगत केलेले गहाळ/स्टोलन अँड्राईड मोबाईल फोन संबंधीत तक्रारदारांना श्रीमती निलीमा आरज उपविभागीय पोलीस अधीकारी, मंगरुळपीर यांनी विनाविलंब परत केले. त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे तरी यापुढे मोबाईल धारकाचा मोबाईल गहाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन येथे मोबाईलचे संपुर्ण कागदपत्रासह रितसर तक्रार नोंदवावी व त्यानंतर CEIR PORTAL वर आँनलाईन फाँर्म भरावा जेणे करुन संबंधीत तक्रारदार यांचा गहाळ / स्टोलन मोबाईल फोन शोध लागणेस मदत होईल.......
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या