🌟पूर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रगतसील शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी कृषी मेळाव्यात स्टॉल लावला होता🌟
परभणी/पुर्णा (दि.२३ फेब्रुवारी) - पुर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रगतसील शेतकरी जनार्धन बालासाहेब आवरगंड यांना परभणी येथील विभागीय कृषी मेळाव्यात लावलेल्या स्टॉलला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे पूर्णा तालुक्यातील माखणी येथील प्रगतसील शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी स्टॉल लावला होता . त्यावर शेंद्रिय खतावरील विविध उत्पादने केलेली सर्व अन्नधान्य ठेवली होती , पापड , लोणचे , विविध दाळी , उसऱ्या, अंजीर , आवळा कॅंडी ठेवण्यात आल्या होत्या. सर्वात जास्त ग्राहकांनी व आधिकारी कर्मचारी यांनी भेटी दिल्या खरेदी केली . त्यांच्या स्टॉलला अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे, धर्मपत्नीसह सौ जोशनाताई काळे ,परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, धर्मपत्नी रूपाली गावडे, एस .पी. काळे , करीना काळे, कुलगुरू इंद्र मणी ,जिल्हा कृषी अधीक्षक रवी हरणे , माहीती तंत्रज्ञान व्यवस्थापक गजानन गडदे , डॉ. दिंगबर पटाईत आदींनी स्टॉलला भेटी देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित
भाजीपाला उत्पादक ग्रूपचे पंडीत थोरात , प्रकाश हरकळ , आत्माच्या स्वाती घोडके , रामेश्वर साबळे , रमेश राऊत ,सुरेश काळे आदीनी परीश्रम घेतले.....
0 टिप्पण्या