🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथे मराठा समाजाचा जल्लोष....!


🌟यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौका ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली🌟

पुर्णा : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी उभारलेल्या लढ्याला यश येऊन समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्यामुळे पुर्णा तालुक्यातील माखणी येथे काल रविवार दि.28 जानेवारी 2024 रोजी सायकाळी 7.00 वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालया समोर जल्लोष करण्यात आला. 


यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. वाजंत्रीच्या तालावर ठेका धरत युकांनी एकच जल्लोष केला.  मुबंई येथील आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांचे रस्त्यामध्ये जागो-जागी महिलांनी औक्षण करुन स्वागत केले. माखणी सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलनात सहभाग घेऊन योगदान दिलेल्या सर्व समाज बांधवाचे भव्य स्वागत करुन सत्कार करण्यात आला. यावेळी गावतील प्रतिष्ठित नागरीकांसह युवकांची मोठी उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या