🌟परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न....!


🌟जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थित प्रशिक्षण संपन्न🌟


परभणी (दि.२२ जानेवारी) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षणासाठी तालुक्यातील ६६७ प्रगणक आणि १५० पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थित प्रशिक्षण संपन्न झाले.

उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, लक्ष्मीकांत खळीकर यांची यावेळी उपस्थिती होती.तीन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण यशस्वीरित्या घेण्यात आले असुन, प्रशिक्षणामध्ये सादरीकरणाद्वारे सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले दिनांक २३ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत वरील प्रगणक आणि पर्यवेक्षक हे प्रत्येक गावामध्ये जाऊन घरोघरी वरील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करणार आहेत.....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या