🌟पाथरी तालुक्यातील उच्चपातळी बंधाऱ्याची तहान भागणार.....!


🌟माजलगावचे माजी आमदार आर.टी.देशमुख यांच्या मागणीला मंत्री संदिपान भुमरे यांचा सकारात्मक प्रतिसाद🌟


प्रतिनिधी

पाथरी :- तालुक्यातील ढालेगाव,तारुगव्हाण,मुदगल आणि खडका या चार बंधारा कार्यक्षेत्रात दुष्काळ असल्याने पिण्यासाठी कालव्या द्वारे किमान तीन पाणी पाळ्या सोडून या भागातील नागरीक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची मागणी माजलगावचे माजी आमदार तथा योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन आर टी देशमुख जीजा यांनी सोमवार ८ जानेवारी रोजी छ. संभाजीनगर येथील जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कालवा समिती बैठकीत लाऊन धरत लेखी निवेदन दिले.याला कालवा समितीचे अध्यक्ष मंत्री ना. संदिपान भुमरे यांनी या चार ही उच्चपातळी बंधा-यात आवश्यक तेवढे पाणी पुढील काळात देण्याचे मान्य केले असल्याची माहिती माजी आ आर टी देशमुख जीजा यांनी फोन वरुन बोलतांना दिली.

जायकवाडी लाभक्षेत्रातील पाणी साठ्याचे यथायोग्य नियोजन करण्या साठी अधिक्षक अभियंता व प्रशासक,लाभक्षेत्र विभाग प्राधिकरण ची बैठक गारखेडा परिसरातील लाभक्षेत्र विकास भवन येथे पालकमंत्री तथा या समितीचे अध्यक्ष ना. संदिपान भुमरे यांच्या  अध्यक्षते खाली संपन्न झाली.  या बैठकी साठी सदस्य मंत्री ना अतुल सावे, विरोधी पक्ष नेते ना अंबादासराव दानवे, माजी आ आर टी देशमुख जीजा, अधिक्षक अभियंते तथा सदस्य सचिव कालवा सल्लागार समितीचे सब्बीनवार, सहाय्य अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग परभणीचे अमोल सुर्यवंशी यांच्या सह इतर सदस्याची उपस्थिती होती.

या वेळी आर टी देशमुख यांनी या नियोजन बैठकीत समन्यायी पद्धतीने पाणी वाटप व्हावे अशी मागणी करत पाथरी तालुक्यात दुष्काळ असुन येत्या महिणा भरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभिर होणार असल्याने ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल, आणि खडका या चार उच्च पातळी बंधा-यात कालव्या व्दारे पाणी सोडण्याची मागणी लाऊन धरत, बी ५९ चारी अनेक ठिकाणी ना दुरुस्त आहे त्यातून पाणी गळती होते ती थांबवण्यात यावी आणि संपुर्ण चारी उपचा-या यातील गाळ आणि झाडे झुडपे काढून शेवटच्या शेतक-यांना पाणी पोचवण्या साठी उपाय योजना करण्याची मागणी करत अपु-या कर्मचा-यांच्या जागा त्वरीत भरव्या या मुळे पाणी वापर संस्था आणि औद्योगिक वापरा यांच्यात सुसंवाद होऊन पाणी पाळीचे योग्य नियोजन होईल.या साठी किमान तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी भरती करण्याची मागणी केली.

या वर्षी पाणी कमी असल्याने शेतक-यांना कृषी विभागा मार्फत योग्य ते मार्गदर्शन करून सुक्ष्मसिंचना कडे वळवत जास्तित जास्त क्षेत्र कमी पाण्यात सिंचना साठी प्रयत्न करवे अशी मागणी या बैठकीत योगेश्वरी शुगर्स चे चेअरमन माजी आ आर टी देशमुख जीजा यांनी कालवा समिती बैठकीत लाऊन धरत या विषयीचे निवेदन या बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री ना. संदिपान भुमरे यांच्या कडे केली. या वेळी पालकमंत्री ना भुमरे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत या पुढे अजून किमान दोन पाणी पाळ्या देण्याचे मान्य करत अधिका-यांनी ही देशमुख यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पुढील उन्हाळ्यात किमान अजून दोन पाणी पाळी मिळतील अशी अपेक्षा ठेवल्याने पिण्याच्या पाण्या सह काही अंशी सिंचनाचा ही प्रश्न मार्गी लागल्याची भावना शेतक-यां मधून व्यक्त होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या