🌟पुर्णा तालुका अखिल भारतीय मराठी परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर....!


🌟पुर्णा तालुकाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार मुजीब कुरेशी तर शहराध्यक्ष पदावर मोहन लोखंडे यांची एकमताने निवड🌟


पुर्णा (दि.२७ डिसेंबर) - पुर्णा तालुका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून पुर्णा तालुकाध्यक्ष पदावर जेष्ठ पत्रकार मुजीब कुरेशी तर शहराध्यक्ष पदावर मोहन लोखंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

पुर्णा शहरातील सुमन मंगल कार्यालयाच्या सभागृहात आज बुधवार दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १२-३० वाजेच्या सुमारास अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य निवडणूक प्रमुख प्राचार्य सुरेश नाईकवाडे,जिल्हाध्यक्ष राजू हट्टेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पूर्णा तालुका व शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त आदर्श शिक्षक हिराजी भोसले तर प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ.हरिभाऊ पाटील,दातात्रय कऱ्हाळे,विठ्ठलराव वडकूते, माणिकराव शिंदे ,लक्षीमिकांत शिंदे,दिनेश चौधरी,सुरेश मगरे,लक्षीमिकांत जवळेकर,ॲड .संजय गव्हाणे, हनुमंत हंबीरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रथमतः राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार विजय बगाटे तसेच मावळते तालुका अध्यक्ष दौलत भोसले,मावळते शहराध्यक्ष केदार पाथरकर,तसेच नूतन जिल्हा सरचिटनिस म्हणून  सतीश टाकळकर यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार मुजीब कुरेशी,कार्यध्यक्ष गजानन हिवरे,उपाध्यक्ष शिवाजी शिराळे , मदनराव अंभोरे,सरचिटणीस अनिस बाबूमिया,चिटणीस विनायक यादव, कोषाध्यक्ष केदार पाथरकर,सह कोषाध्यक्ष शेख अफसर,संघटक रामराव पवार, कायदेविषयक सल्लागार अँड.संजय गव्हाणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अतुल शहाणे,पुर्णा तालुका प्रसिद्धी प्रमुख धम्मपाल हानवते तर पुर्णा शहराध्यक्ष पदावर मोहन लोखंडे शहर कार्याध्यक्ष मो.अलीम मो युसूफ,शहर उपाध्यक्ष पदावर अच्युत जोगदंड,अमृत कऱ्हाळे,शहर सरचिटणीस पदावर सुशील दळवी,शहर चिटणीस पदावर संपत तेली,शहर कोषाध्यक्ष पदावर उत्तम जोंधळे, शहर संघटक पदावर राम भालेराव,यांची निवड जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश मगरे यांनी तर सूत्रसंचालन जगदीश जोगदंड यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल शहाणे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या