🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणूक अवमान याचिका प्रकरण : न्यायालयासमोर राज्य शासनाचा माफीनामा सादर.....!


🌟अशी माहिती याचिकाकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी दिली आहे🌟

नांदेड /प्रतिनिधी- सचखंड गुरुद्वारा बोर्ड अबचलनगरची निवडणूक घेण्यासंदर्भात दाखल याचिकेसंदर्भात दिलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान प्रकरणी राज्य शासनाच्यावतीने महसूल व वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी शपथपत्र दाखल करून माफीनामा सादर केला असल्याची माहिती याचिकाकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी दिली आहे. 

     सचखंड गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 मधील तरतुदींप्रमाणे लोकनियुक्त सदस्यांची निवडीसाठी निवडणूक घेण्यासंदर्भात जगदीपसिंग नंबरदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बोर्डाची निवडणूक घेण्याची विनंती केली होती. यावर उच्च न्यायालयाने निर्णय देत 3 महिन्याचे आत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु राज्य शासनाने कोणतीही कारवाई  केली नसल्याने दुसरी अवमान याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेसंदर्भात राज्य शासनाच्यावतीने महसूल व वन विभागाचे मुख्य सचिवांकरीता अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून अवमान करण्यासंदर्भात कोणताही उद्देश नसून नवीन अधिनियम लागू करण्याची सेवानिवृत्त न्यायाधीश भाटिया यांच्या शिफारसी लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याने उशीर झाल्याचे न्यायालयास सांगून झालेल्या दिरंगाईबाबत माफी मागितली आहे.

    राज्य शासनाने प्रचलित गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 1956 निरस्त करून नवीन अधिनियम लागू करण्याचा घाट घातलेला आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश भाटिया यांनी 2014 मध्ये दिलेला अहवाल आता कालबाह्य झाला असून सदर बाब जनभावना विरोधात असल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्ते जगदीपसिंग नंबरदार यांनी दिली या प्रकरणी याचिकाकर्त्या कडून ॲड.मिरगेश नरवाडकर यांनी काम पाहिले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या