🌟पुर्णा तालुक्यातील लक्ष्मणनगर येथे शासकीय वाळू डेपोला प्रारंभ....!


🌟तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासह वाळू तस्करीला लागणार लगाम : वाळू ग्राहकांना मिळणार सहाशे रुपये ब्रास या दरात वाळू🌟

🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले शासकीय वाळू डेपोचे थाटात उद्घाटन🌟

परभणी : परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे शासकीय वाळू डेपोला सुरुवात झाली असून राज्यातील सर्वसामान्य लोकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्हा महसूल प्रशासनांतर्ग पुर्णा तालुक्यातील लक्ष्मणनगर येथे जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत शासकीय वाळू डेपोचे थाटात उद्घाटन करण्यात आले असून आता तालुक्यातील वाळू ग्राहकांना शासकीय दराप्रमाणे वाळू मिळणार असल्याने आता वाळू चोरीसह चोरट्या वाळू तस्करीला देखील लगाम लागणार असल्याचे बोलले जात आहे.

पुर्णा तालुक्यातील लक्ष्मनगर येथील शासकीय वाळू डेपो उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसिलदार माधव बोथीकर,प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश घोळवे, मंडळ अधिकारी, जायभाये, रवी कवडे, व शासकीय वाळू डेपो कंत्राटदार प्रवीण अग्रवाल आदी उपस्थित होते. 

शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार शासकीय रेती डेपोच्या माध्यमातून सहाशे रुपये प्रति ब्रासप्रमाणे रेती देण्याचे शासनाचे धोरण आहे. या अंतर्गत रेती घाटांचे सर्वेक्षण, पर्यावरण विभागाची मान्यता व निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. तथापि नागरिकांना लवकर रेती उपलब्ध व्हावी, यासाठी नदीपात्रात पाणी असलेल्या रेती घाटाच्या ठिकाणी गाळमिश्रित रेतीघाटातून गाळमिश्रित रेती काढणेबाबत जलसंपदा विभागाकडून आलेल्या शिफारशीप्रमाणे राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेनुसार पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथील रेती घाट व लक्ष्मणनगर येथील रेती डेपो पहिल्याच फेरीत लिलावात गेल्याने जिल्ह्यात प्रथमच या ठिकाणी शासकीय रेती डेपोची सुरुवात करण्यात आली आहे.

नागरिकांना ६००/- रूपये प्रति ब्रास दराने रेती उपलब्ध होणार आहे. नागरिक महा-ई-सेवा केंद्रातून त्यासाठी नोंदणी करून रेतीची मागणी करू शकतात. नोंदणी केलेले नागरिक आपली पावती घेऊन या शासकीय रेती डेपोमधून रेती घेऊन जाऊ शकतात. नागरिकांना प्रत्येकी दहा ब्रास इतकी रेती मिळू शकते. तसेच रेती डेपो पासून घरापर्यंत रेती नेण्याचा खर्च संबंधित नागरिकांनी करायचा आहे. सर्वसामान्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या