🌟भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ.मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीची पाहणी....!


🌟तात्काळ पंचनामे करण्याच्या संबंधित अधिकार्‍यांना दिल्या सूचना🌟


परभणी : भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी शुक्रवार दि.०१ डिसेंबर २०२३ रोजी जिंतूर तालुक्यातील देवगाव व धानेरा या गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

                अवकाळी पावसामुळे जिंतूर तालुक्यात शेतकर्‍यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, एकही बाधित शेतकरी त्यापासून वंचित राहू नये, अशा सूचना आमदार बोर्डीकर यांनी यावेळी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. याप्रसंगी नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, बोरी बाजार समितीचे सभापती आत्माराम पवार, कसर सरपंच विठ्ठल शिंदे, नाना घोरपडे, अंबादास ईप्पर, यादव सानप, गणेश खापरे, बाळासाहेब खापरे, गंगाधर गिरी, शिवाजी कदम,अंगद कदम आदींची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या