🌟परभणी येथे दोन वाहनांवर एकच क्रमांक टाकून उपप्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक.....!


🌟शहरातील गालीब नगर व एलोरा कॉलनी भागात आढळली एकाच क्रमांकाची दोन वेगवेगळी वाहनं🌟 

परभणी (दि.२३ डिसेंबर) : दोन वाहनांवर एकच क्रमांक टाकून उपप्रादेशिक परिवहन विभागाची फसवणूक करणार्‍याविरुध्द येथील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           शहरातील गालीब नगर व एलोरा कॉलनी भागात दोन वेगवेगळी वाहने आहेत. परंतु, या दोन्ही वाहनांवर एकच क्रमांक आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकास कळाल्याबरोबर या पथकाने दोन्ही वाहने जप्त केली. वाहन मालकांकडून कागदपत्र मागवून तपासली, तेव्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने खोटा पासींग क्रमांक टाकून वाहन चालवून फसवणूक केल्याबद्दलची माहिती निदर्शनास आणून दिली. दरम्यान, या प्रकरणात अब्दुल इलियाज, मोहम्मद अब्दुल निसार या दोघांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या