🌟चोपडा तालुक्यातील निमगव्हाण गावात ग्रामनी फाउंडेशन तर्फे निमगव्हाण येथे तापीनदीत स्वच्छता अभियान....!


🌟नदीत पुलाजवळ बऱ्याच प्रमाणात कचरा,प्लास्टिक,कपडे,फूले, नारळ, देवांचे फोटो तथा मुर्ती जमा झाले🌟


चोपडा (दि.१४ डिसेंबर) - स्थानिक चोपडा तालुक्यातील निमगव्हाण गावालगत वाहणाऱ्या तापीनदी पात्राची स्वच्छता ग्रामनी फाउंडेशनच्या युवकांनी केली.

          नदीत पुलाजवळ बऱ्याच प्रमाणात कचरा, प्लास्टिक, कपडे, फूले, नारळ, देवांचे फोटो तथा मुर्ती जमा झालेल्या होत्या. पाण्याचा प्रवाह अडून तेथे पाणी थांबले होते. त्यामुळे त्या पाण्यात घाण साचलेली होती आणि पाणी दूषित झाले होते. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना आणि जनावरांना हेच दूषित पाणी प्यावे लागत होते. ही बाब  लक्षात घेऊन नदी स्वच्छेतेसाठी ग्रामनी फाउंडेशनचे तालुकासचिव वैभव शिरसाठ यांनी पुढाकार घेत कार्य हाती घेतले. फावडे, घमेले, आंकडे बांधलेले बांबू घेऊन युवकांना गोळा केले आणि त्या नदीपात्रात हसतखेळत स्वच्छता अभियान यशस्वी केला.

        या स्वच्छता अभियानात गौरव सुकदेव बाविस्कर, गौरव नामदेव बाविस्कर, तुळसीदास गोपाल बाविस्कर, वैभव नामदेव बाविस्कर, सचिन रामचंद्र कोळी, वैभव रविंद्र शिरसाठ आदींनी परिश्रम घेतले. परिसरात ग्रामनी फाउंडेशनच्या या श्रमदानाची चर्चा होत आहे. अशी माहिती आमच्या न्यूजनेटवर्क कार्यालयाला श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी दिली आहे.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या