🌟परळीत शासन आपल्या दारी या कार्यक्रमात परळी शहरातील बौद्ध धम्म केंद्राच्या वाढीव निधीस मंजुरी देण्यात यावी.....!


🌟अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली🌟 

 परळीत आज होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात परळी शहरातील बौद्ध धम्म केंद्राच्या वाढीव निधीस मंजुरी देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी केली आहे.   याबाबत सविस्तर माहिती अशी की गेल्या विधानसभेला मोठा गाजावाजा करून सध्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी शहरात दलितांसाठी भव्य असे बौद्ध धम्म केंद्राची निर्मिती करण्यात येईल या आश्वासनावर मोठ्या फरकाने विधानसभा जिंकली व परळी शहर व तालुक्यातील तमाम दलित बांधवांनी सध्याच्या पालकमंत्री यांना भरभरून मतदान केले परंतु जशी घोषणा केली तसेच ती हवेत विरंगळते की काय अशी चर्चा होताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परळी शहरातील बौद्ध धम्म केंद्राचे बांधकाम तात्काळ चालू करण्यात यावी या मागणीसाठी परळी नगरपालिकेपुढे आमरण उपोषण करण्यात आले. 

त्यावेळी संबंधित मुख्याधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीला लेखी पत्र देऊन लवकरच बौद्ध धम्म केंद्राला वाढीव निधीचा प्रस्ताव पाठवून मंजूर करून आणण्यात येऊन सदरील बौद्ध धम्म केंद्राचे बांधकाम करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते परंतु परळी शहरातील वैद्यनाथ तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत घोषित केलेल्या व सध्या बांधकाम चालू असलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र योजनेतील विविध कामासाठी वाढीव निधी मागून घेण्यात आला व त्यास मंजुरीही आणण्यात आली परंतु परळी शहरातील दलितांची अस्मिता असलेल्या बौद्ध धम्म केंद्राची अद्यापही वाढीव निधी तर सोडाच प्रस्ताव ही पाठवला नसल्याची येथील नागरिकांना शंका आहे त्यासाठी सध्या आज परळी शहरात होत असलेल्या शासन आपल्या दारी याच कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी परळी शहरातील बौद्ध धम्म केंद्राच्या वाढीव निधीची घोषणा करण्यात यावी असेही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली असून तसे न झाल्यास येत्या 26 जानेवारी पासून वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी आंदोलन करणार असल्याची ही वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बालासाहेब जगतकर यांनी माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या