🌟परभणीत शिवसेना उबाठा गटाला खिंडार : दोनशे कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश......!


🌟युवासेना विभाग प्रमुख अनिल रेंगे/भागवत रेंगे यांनी दोनशे कार्यकर्त्यांसह भाजपात जाहीर प्रवेश🌟

परभणी (दि.१० डिसेंबर) - परभणीत शिवसेना उबाठा गटाला गटाला खिंडार पडली असून परभणी शहरातील युवा सेना उबाठा गटाचे वार्ड क्र.१० चे विभाग प्रमुख अनिल रेंगे यांनी आठ आपल्या दोनशे कार्यकर्त्यांसह भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सखा गार्डन येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

 यावेळी भाजप विधानसभा प्रमुख आंनद भरोसे , भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास बाबर, भाजप प्रदेश उद्योग आघाडीचे प्रमोद वाकोडकर , भाजप सरचिटणीस भीमराव वायवळ , संजय रिझवणी , रामदास पवार , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय डहाळे , अजिंक्य औंढेकर , संजय कुलकर्णी , गणेश जाधव , प्रल्हाद रेंगे , दत्ता रेंगे , आदींसह भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या