🌟शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी अंतरवाली सराटीत घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट.....!


🌟मनोज जरांगेची प्रकृती चिंताजनक ; मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने तात्काळ मार्ग काढावा - रविकांत तुपकर 

🌟सरकारने मराठा आरक्षणावर तात्काळ निर्णय घेतला नाही तर सरकारला याची किंमत मोजावी लागेल - रविकांत तुपकर


शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मराठा आरक्षणासाठी प्राणप्रणाने लढणारे मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी (जि.जालना) येथे ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट घेतली. उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनकरीत्या खालावली असल्याचे पाहून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी   त्यांना   पाणी व सलाईन घेण्याची विनंती केली. यावेळी वेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून या आंदोलनात सक्रिय सहभागी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांना सांगितले. मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहता रविकांत तुपकर यांनी त्यांच्याशी बोलतांना सांगितले की, आपण या आंदोलनाचा उर्जास्त्रोत आहात. आपल्या प्रेरणेने राज्यभरातील अनेक तरुण आपले सर्वस्व अर्पण करून आंदोलनात उतरले आहेत. आता ही आर या पारची लढाई निर्णायक वळणावर आलेली असतांना तब्येतीसोबत काही अप्रिय घडणे उचित होणार नाही. आंदोलनकर्त्यांचे आपण बळ आहात, त्यामुळे मनोज जरांगेंनी पाणी  प्यावे, व सलाईन लावून घ्यावी अशी विनंती देखील शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी त्यांना यावेळी केली.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी  या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की दरवर्षी आम्ही या कालावधीत सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांवर मोठे आंदोलन उभारतो व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतो. परंतु यावर्षी मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने ०१ नोव्हेंबर पासून नियोजित सोयाबीन-कापूस ‘एल्गार रथयात्रा तूर्तास स्थगित करत आहोत. सध्या मराठा आरक्षणाचा लढा निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्यात आपण सहभागी आहोत. मराठा आरक्षणाच्या या आंदोलनानंतर लवकर आपण सोयाबीन-कापूस प्रश्नी आक्रमक पणे रस्त्यावर उतरणार आहोत, असे यावेळी रविकांत तुपकरांनी स्पष्ट केले. सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता तातडीने आरक्षण प्रश्नी तोडगा काढावा, अन्यथा सरकारला यांची किंमत मोजावी लागेल, असा इशारा देखील यावेळी शेतकऱ्यांची मुलुख मैदानी तोफ ओळखले जाणारे शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी यांनी सरकारला दिला.

यावेळी  विनायक सरनाईक, नितीन राजपूत, सुरेश काळे , मधुकर शिंगणे, शेख जुल्फेकार, अजय गायकवाड, रामेश्वर अंभोरे, सुधाकर तायडे, संतोष शिंगणे, महेंद्र कड उपस्थित होते..... 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या