🌟मराठा समाजास त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी कायम भूमिका राहिली आहे - आ.डॉ.रत्नाकर गुट्टे


🌟मुख्यमंत्र्यांना तसा पत्रव्यवहार सुध्दा केल्याचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे म्हणाले🌟


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी गंगाखेड शहरातील आपल्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन उद्घाटने व इतर कार्यक्रम टाळणार असल्याचे घोषित केले. तसेच मराठा आरक्षणाच्या बाजूने आपण कायम आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असेही कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी स्पष्ट केले. 

मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन व इतर कार्यक्रम मराठा आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी मार्गी लागेपर्यंत तरी तरी घेवू नयेत, अशी विनंती सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने लोकप्रिय आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांना करण्यात आली होती. त्यामुळे आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

मराठा समाजास त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, हि माझी कायम भूमिका राहिली आहे. त्यासाठी मी एकदिवसीय अन्नत्याग उपोषण करून मुख्यमंत्र्यांना तसा पत्रव्यवहार सुध्दा केला आहे. तसेच मराठा बांधवांच्या आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी मार्गी लावावा. असेही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब म्हणाले. 

पण, मला सर्व समाज बांधवांना हेही आवर्जून सांगायचे आहे की, आपल्या मतदारसंघातील काही कामांचे वेळेवर भूमिपूजन किंवा उद्घाटन होवून ती कामे वेळेवर सुरू झाली नाहीत तर, त्या कामांसाठी आलेला निधी परत शासनास वर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सकारात्मक विचार करून काही विकासकामांचे उद्घाटन त्या-त्या गावातील किंवा ठिकाणचे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक किंवा इतर जेष्ठ नागरिक करतील, त्यास आपण मोठ्या मनाने परवानगी द्यावी, हि आपणांस हात जोडून विनंती आहे, असे विनंतीवजा आवाहन विकासरत्न आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी केले आहे. 

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले,  मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, तालुका प्रभारी हनुमंत मुंढे, संचालक संभुदेव मुंढे, तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ बापू सातपुते, उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण आप्पा मुंढे, युवक तालुकाध्यक्ष बालासाहेब लटपटे, वैजनाथ टोले, भास्कर ठवरे, बालासाहेब शिंदे, उध्दव शिंदे, आप्पासाहेब कदम, उध्दव चोरघडे, गोविंद डोणे, नागेश शिंदे यांच्यासह पत्रकार बांधव, पदधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या