🌟 कळलाव्या व कळदाब्या : विशेष लेख - अनिल केळकर🌟
आपण आपल्या लहानपणापासून ज्यावेळी पौराणिक कथा ऐकतो व पौराणिक चित्रपट पाहतो त्यावेळी नारद मुनीची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या मनावर नोंदली गेली आहे लहानपणापासून नारद मुनी हे देवा देवात भांडणे लावणारे ,चहाड्या करणारे, कळलावेपणा करणारे असे व्यक्तिमत्व आहे अशी आपली दृढ कल्पना झालेली आहे
*नारद पुरस्कार व युट्युब सम्राट*
परवाच युट्युब वर सुब्रमण्यम स्वामी यांचा मराठी भाषिकांनी केलेला कार्यक्रम पाहण्यास मिळाला या कार्यक्रमात अनेक पत्रकारांना सुब्रमण्यम स्वामींचे हस्ते पुरस्कार देण्यात आला व त्या पुरस्काराचे नाव होते 'नारद पुरस्कार' हा पुरस्कार महाराष्ट्रातील युट्युब सम्राट मा.भाऊ तोरसेकर यांना देण्यात आला होता या कार्यक्रमाच्या वेळी भाऊंनी आपल्या सत्कारास छोटेखानी उत्तर दिले त्या अतिशय मार्मिक व नवीन माहिती देणारे होते
( आपणास शक्य झाल्यास आपण युट्युब वर ही क्लिप पाहू शकता)
भाऊंनी थोडक्यात नारद मुनी हे पहिले पत्रकार आहेत असे विवेचन करून पुढे म्हटले की नारद मुनी कृष्णा पासून शंकरापर्यंत इंद्रा पासून ब्रह्मदेवापर्यंत जाऊन कळलावेपणा करत होते असे गृहीत धरले तर हे सर्व देव सर्वव्यापी व सर्वज्ञानी असताना त्यांना नारद मी कळलावेपणा करतात हे लक्षात आले नसेल का ?
*विशिष्ट बटन (कळ)*
पण ज्याप्रमाणे संगणकात सर्व प्रकारची ज्ञान भरलेले असते पण विशिष्ट बटन (कळ ) दाबल्याखेरीज ते ज्ञान समोर येत नाही त्याप्रमाणे नारद मुनी कळलावेपणा न करता कळदाबे पणा करत होते भाऊंच्या भाषणातील सर्वच्या सर्व मी येथे लिहू शकत नाही पण त्याचा आशय व तथ्य माझ्या लक्षात आले आपण जर युट्युब ची भाऊंची या विषयाची पोस्ट पाहिली तर आपणास या विचाराचा उलगडा बरोबर होईल.
*पत्रकाराची मांदियाळी*
आज हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे आपल्या देशात आज हजारो न्यूज चॅनल्स सुरू आहेत या न्यूज चॅनलचे लाखो प्रतिनिधी देशभर बातम्या गोळा करत नव्हे तयार करत फिरत असतात
*विशेषाधिकार*
आपण न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आहोत हा आपला विशेष अधिकार आहे असे समजून कोणासही काहीही प्रश्न विचारायचा आपल्याला अधिकार आहे व त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर देणे त्याचे कर्तव्य आहे अशी भावना मनात बाळगून मोठ्या अहंकाराने आणि हे प्रतिनिधी प्रश्नावली विचारत असतात
*कळलावे पणा म्हणजे पत्रकारीता*
या नेत्यांनी काय म्हणाले हे त्या नेत्याला जाऊन सांगणे व त्यावर त्याची प्रतिक्रिया घेऊन पुन्हा पहिल्या नेत्याला तुमच्याबद्दल हा नेता असे म्हणाला तुमचे मत काय असे विचारून समाजात अगर पक्षात नेत्यात कसा वितंडवाद तयार होईल असा हे न्यूज चॅनल चे प्रतिनिधी सतत प्रयत्न करतात
*आधी उत्तर मग प्रश्न*
केजरीवाल, संजय राऊत, उद्धव ठाकरे , यांच्या पत्रकार परिषदेत मात्र पूर्वी काढून दिलेल्या प्रश्न विचारले जातात त्यावेळी मात्र या न्यूज चॅनल प्रतिनिधींचा बाणेदारपणा लुप्त झालेला असतो राऊत यांनी ठाकरे याची घेतलेली मुलाखत आठवत असेलच
महानायक अभिताभ बच्चन यांच्या ७१ व्या वाढदिवसाबद्दल समारंभ सुरू होता त्यावेळी एक पंचवीस वर्षीय तरुण पत्रकार हिने त्या भर कार्यक्रमात अमिताभ बच्चन आपण आर्थिक दृष्ट्या दिवाळखोर झाला होता त्यावेळी आपल्याला काय वाटत होते अशा प्रश्न विचारला होता
ही पत्रकार तरुणी पंचवीस वर्षाची होती याचा अर्थ पत्रकारितेतील तिचा अभ्यास हा अगदी नव्याने होता पत्रकारीतील तिची तपश्चर्या अगदी मामुली होती पण माझ्या हातात माईक आहे मी कोणास काहीही विचारेन हा अहंकार मोठा होता
तुमच्या एखाद्या प्रश्नाने काही रहस्य उलगडले गेले असे कधीही होत नाही पण आपण सर्वज्ञानी व सर्वव्यापी आहोत अशी दाखवले जात आहे
या कळलाव्या पत्रकारांच्या पासून समाजाचे रक्षण व्हावे एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना !
परवाच एक वाक्य वाचनात आले ते असे होते
*पहिले छपते थे फिर बिकते थे*
*अब पहिले बिकते है फिर छपते है*
इतकेच...
धन्यवाद.. !
आपला नम्र
अनिल केळकर
९९६९३२०३३२
0 टिप्पण्या