🌟परभणी उपविभागीय कार्यालयामार्फत मराठा कुणबी जात प्रमाणपत्राचे वितरण......!


🌟अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्ते मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले🌟


परभणी (दि.06 नोव्हेंबर) : जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील नागरिकांना कुणबी मराठा - मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरणांस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते नुकतीच सुरुवात झाली आहे. परभणी तालुक्यातील सुलतानपूर येथील तीन लाभार्थ्यांना आज अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. 


याप्रसंगी उपविभागीय अधिकारी दत्तु बाळु शेवाळे, तहसीलदार संदीप राजपुरे, नायब तहसीलदार महसूल गणेश चव्हाण, अव्वल कारकुन प्रकाश गोरे, तलाठी रामेश्वर गुरले, माणिक गिरी यांची उपस्थिती होती.यावेळी परभणी तालुक्यातील सुलतानपूर येथील मुरलीधर सखाराम पांढरकर, बालासाहेब मुरलीधर पांढरकर आणि  श्रीधर मुरलीधर पांढरकर या तीन लाभार्थ्यांना आज मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. जिल्ह्यात मराठा कुणबी - कुणबी मराठा जात प्रमाणपत्राचे प्राधान्याने वितरण करण्याची कार्यवाही प्रशासकीय पातळीवर सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हास्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांना वंशावळी, वारसा नोंदी आदी पुराव्यानुसार मराठा कुणबी-कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरीत करण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जात प्रमाणपत्रासाठी संबंधीत कार्यालयाकडे अर्ज सादर करुन आपले जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे...... 


****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या