🌟परभणीत ‘माविम’चा तीन दिवसीय ‘दीपावली महोत्सव’ आजपासून....!


🌟जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे - बाळासाहेब झिंजाडे 

परभणी : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक योजनामध्ये महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व मालाच्या विक्री प्रदर्शन अर्थात दीपावली महोत्सव बुधवार(8)पासून सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत महात्मा गांधी पार्क येथे आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी केले आहे.आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते महिला स्वंयसहायता बचत गटाचे बँक कर्जाचे धनादेश वितरण होणार आहे. 

गुरुवार, (दि.9) रोजी सकस पोषक आहार डिश स्पर्धा व आरोग्यविषयक जाणीव जागृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तर शुक्रवार, (दि. 10) रोजी प्रदर्शनात सहभागी महिलांना प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट विक्री झालेल्या प्रथम 3 स्टॉल्सचा सन्मान करण्यात येणार असून, स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनाही सन्मानित करण्यात येणार आहे या प्रदर्शनात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ  चिवडा, लाडू, करंजी, चकली, शेव, बालुशाही, बाकरवडी, फरसाण, तूप, पनीर, लोणी, दही, पाणीपुरी, भेळ तसेच विविध मसाले, चटण्या, पणत्या, आकाशदिवे, तोरणे, दिवे, साड्या, रेडीमेट गारमेंट आदी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

    महिला स्वयंसहाय्यता बचत गटांना कर्ज वितरण विषयान्वये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून याचे आयोजन करण्यात आले असून, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगिण विकास साधण्याचे काम करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 3 हजार 950 बचत गटांच्या माध्यमातून 45 हजार 500 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. महिलांना विविध बँकेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय उभारणीसाठी दरवर्षी 45 ते 50 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. तसेच कर्ज परतफेडीचे प्रमाणही 99.9% इतके आहे. बँक कर्जाच्या माध्यमातून महिलांनी विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू व मालाला बाजारपेठ मिळावी, या हेतूने दीपावली महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी पार्क येथे 8 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. झिंजाडे यांनी केले आहे.  

 प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. बी. भोसले, जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक उदय कुलकणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवि हरणे, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक एस. के. नवसारे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक पवार, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर परदेशी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुठ्ठे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, पशुधन विकास अधिकारी श्री. सावने, आयसीआयसीआय बँकेचे जिल्हा व्यवस्थापक किरण राठोड तसेच स्वावलंब महिला पतसंस्थेच्या सचिव अंबिका डहाळे यांची उपस्थिती राहणार आहे..... 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या