🌟जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील नागलवाडी व बोरजंती गावात दिवाळीला ग्रामनी फाउंडेशनने गरजूंना वाटले कपडे....!


🌟या मानवतावादी लोककल्याणकारी उपक्रमाची महाराष्ट्रात सर्वत्र प्रशंसा🌟


चोपडा: (दि.१२ नोव्हेंबर) - जळगाव जिल्ह्याच्या स्थानिक चोपडा तालुकातील नागलवाडी व बोरजंती या गावात ग्रामनी फाउंडेशन तर्फे गरजू लोकांना दिवाळी निमित्त कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सदर मानवतावादी लोककल्याणकारी उपक्रमाची सद्या महाराष्ट्रात सर्वत्र प्रशंसा होत आहे बरेच असे लोकं आहेत जे दिवाळी साजरी करू शकत नाही, नवे कपडे घेऊ शकत नाही. त्यांना या दिवाळीत काहीतरी भेट देऊन त्यांना हसवावे या हेतूने ग्रामनी फाउंडेशनचे चोपडा तालुकासचिव वैभव शिरसाठ यांनी पुढाकार घेतला आणि या प्रशंसनीय अभिनव उपक्रमाला चालना दिली या पुण्यप्रतापी कार्यात नामदेव बाविस्कर, वैभव बाविस्कर, गौरव बाविस्कर, भावेश वाघ, वर्षा मॅडम, रितेश पाटील, सुदर्शन धजे आणि संपूर्ण ग्रामनी फाउण्डेशन परिवाराचे तनमनधनाचे अमूल्य असे सहकार्य यात लाभले, हे विशेष..!


     माहिती दाते फाउण्डेशनचे अध्यक्ष अमोल शांताराम पाटील यांनी मुलाखतकार श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींना दैनिकात बातमी देण्यासंबंधी विनंती केली. तेव्हा हे महान कार्य जाणून मु.रामनगर,गडचिरोली येथील श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी मोबाईलवरच अध्यक्ष पाटील यांची १ तासभर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मुलाखत वजा माहिती घेतली. त्यात विचारलेले प्रश्न असे- सर, हा उपक्रम किती वर्षांपासून सुरू आहे? दरवर्षी कोणकोणत्या सणास वितरण केले जाते? कसे वाटप करता, घरोघरी जाऊन की एका ठराविक ठिकाणी समारंभ आयोजित करून? ग्रामनी फाउण्डेशन तर्फे आणखी कोणते उपक्रम, कार्य, कार्यक्रम राबविले जातात. फाउण्डेशन मुख्य हेतू काय? आदी अत्यावश्यक व प्रेरणादायी माहिती कळवण्यास सुद्धा विनंती केली. तेव्हा फाउण्डेशनचे अध्यक्ष मु.हरसवाडी, ता.चोपडा, जि. छत्रपती संभाजीनगर येथील अमोल शांताराम पाटील यांनी माहिती सांगितली- सर, ह्याचवर्षांपासून सुरुवात केली आहे. मागे आम्ही गरीब लोकांसाठी ३ वेळा मोफत आरोग्य शिबीरं राबवली. ह्या दिवाळीला कापडं वाटप केली. कपडे गावात जाऊन घरोघरी वाटले. ग्रामनी फाउंडेशन कडून स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण मोहीम, कपडे वाटप, पुस्तक वाटप आदी उपक्रम राबवित आहोत. पुढे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे, मोफत उपचार करून देणे आदी कामे देखील करणार आहोत. जे समाजासाठी उपयोगाचे कार्य आहे, ते सर्व ह्या फाउंडेशन मार्फत करणार आहोत. फाउंडेशनचा मुख्य हेतू म्हणजे गावाला विकासाच्या मार्गांवर आणणे. गरजू मुलांना शिक्षण उपलब्ध करून देणे आणि जे आपले इलाज करू शकत नाही अश्याना मोफत उपचार उपलब्ध करून देणे आहे, असेही त्यांनी फोनवर सांगितले. त्यांचे फाउण्डेशनने आरंभलेले कार्य व पुुढील मनोदय ऐकून निकोडे गुरूजीं अवाक् होत उद्गारले, आपल्या लोककल्याणी कार्यास व आपल्या पावण चरणी माझे कोटी कोटी दंडवत प्रणाम...!



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या