🌟परभणीत जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फटाके फोडून जल्लोष....!


🌟संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाड्यातील जनतेचा हा मोठा विजय🌟

परभणी : परभणी येथे आज मंगळवार दि.21 नोव्हेंबर रोजी जायकवाडी धरणात वरील धरणातून पाणी सोडण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने कायम राखत स्थगित देण्यास नकार दिला. यामुळे समन्यायी पाणी वाटप धोरणा नूसार मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


उत्तर महाराष्ट्रातील नगर नाशिक जिल्हातील साखर कारखान्याच्या वतीने मराठवाड्याला पाणी सोडू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचीका  दाखल करण्यात आली होती.सरकारने तात्पुरती स्थगिती दिली होती. कालच दि 20 नोव्हेंबर रोजी संभाजी नगर /औरंगाबाद येथे राज्य सरकारने दिलेल्या स्तगीती विरोधात  जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात  आंदोलन करण्यात आले होते यामध्ये भाजपा सोडून सर्व पक्षांनी एकत्र येऊन आंदोलन केले होते. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परभणीत फटाके फोडून  घोषणा देण्यात आल्या व मोठा जल्लोष करण्यात आला. 


यावेळी पाटबंधारे मंत्री देवेंद्र फडणवीस वरच्या धरणातील पाणी सोडा, किंवा सत्ता सोडा....मराठवाड्यातील जनतेशी भेदभाव चालणार नाही....आशा प्रकारचा इशारा कॉ राजन क्षीरसागर यांनी संघर्ष समितीच्या वतीने दिला संविधान दिनाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाड्यातील जनतेचा हा मोठा विजय आहे. त्यावेळी खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव,कॉ राजन क्षीरसागर,पंढरीनाथ घुले पाटील, बाळासाहेब जामकर,अजय चव्हाण, रामेश्वर आवरगंड, ओंकार पवार, प्रसाद गोरे, सिध्दोधन भालेराव, उमेश देशमुख मिरखेलकर ,अर्जुन साबळे पाटील, मितेश सुक्रे, देविदास खरात, गंगाधर रणेर, संदीप सोळूंके, पप्पू वाघ आदिसह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या