🌟कारखान्याचे संचालक प्रमोद जाधव यांच्या हस्ते मोळी टाकून साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ🌟
परभणी : परभणी तालुक्यातील आमडापूर पो.सिंगनापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स या साखर कारखान्याचे संचालक प्रमोद जाधव यांच्या हस्ते दि.०४ नोव्हेंबर २०२३ रोजी मोळी टाकून साखर कारखान्याच्या गळीत हंगाम -२०२३/२४ चार शुभारंभ करण्यात आला.
श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स या साखर कारखान्याच्या हंगाम २०२३/२४ साठी कारखान्याने ६०० बैलगाडी,१५० मिनी ट्रॅक्टर,३०० ट्रक/ट्रॅक्टर यासह ०६ तोडणी यंत्र अश्या मोठ्या प्रमाणात उस तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यान्वित केली असून कारखान्याने तब्बल ०६ लाख टन उस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या आर्थिक मदतीसाठी मागील हंगाम २०२२/२३ मध्ये उस गाळपास दिलेल्या शेतकऱ्यांना एफआरपी दरापेक्षा जास्त १००/-रुपयें प्रती मेट्रिक टना प्रमाणे ज्यादा उस बिल देण्यात येणार आहे
त्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला जास्तीतजास्त उस श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्स कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे संचालक श्रीमती अनुराधाताई नागवडे,संजय धनकवडे व प्रमोद जाधव यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या