🌟बारामतीत आयोजित राज्य शिखर अधिवेशनात मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांना पुरस्कार प्रदान🌟
देशातील 38 हजार पत्रकारांची नंबर वन संघटना असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाचा पहिला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट जिल्हाध्यक्ष पुरस्कार परभणीला मिळालाय, बारामती येथे आयोजित केलेल्या राज्य शिखर अधिवेशनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,पदश्री पोपटराव पवार, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख म्हणाले की आपण दिलेली कौतुकाची ही थाप पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच बळ देत राहील. आदरणीय संदीप काळे सर, कार्यालयीन सेक्रेटरी दिव्या भोसले मॅडम, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला सर,प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के सर, विभागीय अध्यक्ष विजय चोरडियाजी आणि समस्त परभणी व्हॉईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी,मार्गदर्शक मंडळी,सदस्य आणि सहकारी मित्राचें परभणी जिल्हाध्यक्ष म्हणून मी मनःपूर्वक आभार मानतो असेही देशमुख म्हणाले......
0 टिप्पण्या