🌟मराठा बांधवांना जिल्हा प्रशासनाकडे आंदोलनाच्या नोंदी करण्याचे अहवाल....!


🌟सकळ मराठा समाज परभणीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे🌟 

परभणी / प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जे वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने चालू आहेत त्या आंदोलनाच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व पोलीस ठाण्यात करावी कारण अनेक आंदोलनाच्या नोंदी जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे दिसून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे चुकीचे आकडे गेले आहेत या कमी आकड्यामुळे आंदोलनाची तीव्रता ही कमी दिसून येत आहे यामुळे राज्यकर्त्यावर दबावही कमी होत आहे त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवांना सकळ मराठा समाज परभणी च्या वतीने विनंती करण्यात येते की आपल्या आंदोलनाच्या नोंदी त्वरित कराव्या. 

परभणी जिल्ह्यात २६ ऑक्टोबर पासून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने चालू आहेत या आंदोलनात आजपर्यंत २ गुन्हे, ३ आत्महत्या, ८ मुंडन आंदोलन, २ जलसमाधी आंदोलन, 23 मोर्चे, ८पदयात्रा, ५ तिरडी आंदोलन, 15 मोटरसायकल रॅली, ३४० गाव बंदी ठराव, १ ट्रॅक्टर मोर्चा, ३ कार्यक्रमावर बहिष्कार, एकूण आंदोलनाच्या संदर्भात 422 निवेदने, ८२ ठिकाणी मतदानावर बहिष्कार, 92 कॅण्डल मोर्चे,16 रस्ते रोको आंदोलन, 61 ठिकाणी निदर्शने, 5 ठिकाणी पाण्याच्या टाक्यावर चढून आंदोलन व 322 साखळी आंदोलन झाले असल्याच्या नोंदी जिल्हा प्रशासनाकडे झाल्या आहेत. परभणी जिल्ह्यात यापेक्षाही जास्त आंदोलने झाले आहेत अशी खात्रीने माहिती जिल्हाधिकारी यांना दिली असता त्यांनी आमच्याकडे जी नोंद झाली तीच माहिती आम्ही प्रकाशित करतो असे सांगितले. यावरून अनेक गावाच्या नोंदी जिल्हा प्रशासनाकडे आल्या नाहीत असे दिसून आले आहे आपल्या आंदोलनाची आकडेवारी फार मोठी आहे ती महाराष्ट्र शासनाच्या राज्यकर्त्यापर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे त्यावरूनच आंदोलनाची तीव्रता त्यांच्या लक्षात येईल व या तीव्रतेच्या आधारे शासन पुढील निर्णय घेईल त्यामुळे सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की आपले जे आंदोलने होत आहेत त्याची त्वरित नोंद जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय पोलीस ठाणे या ठिकाणी करून घ्यावी असे अहवाल सकळ मराठा समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने करण्यात येते.राठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जे वेगवेगळ्या प्रकारे आंदोलने चालू आहेत त्या आंदोलनाच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील व पोलीस ठाण्यात करावी कारण अनेक आंदोलनाच्या नोंदी जिल्हा प्रशासनाकडे नसल्याचे दिसून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे चुकीचे आकडे गेले आहेत या कमी आकड्यामुळे आंदोलनाची तीव्रता ही कमी दिसून येत आहे यामुळे राज्यकर्त्यावर दबावही कमी होत आहे त्यामुळे सर्व मराठा समाज बांधवांना सकळ मराठा समाज परभणी च्या वतीने अहवान करण्यात येते की  आपल्या आंदोलनाच्या नोंदी त्वरित  जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात कराव्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या