🌟कार्तिकी एकादशी निमित्त दि.२० ते २६ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर साठी दररोज तीन विशेष रेल्वे गाड्या चालवा....!

          


🌟यासंदर्भात एक एक निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या प्रबंधक श्रीमती नीती सरकार यांना देण्यात आले🌟 


परभणी (दि.१६ नोव्हेंबर) - कार्तिकी एकादशीनिमित्त औरंगाबाद,अकोला आणि आदीलाबाद येथून पंढरपूर साठी दररोज तीन विशेष रेल्वे दि.२० नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २३ दरम्यान दररोज चालवण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे यासंदर्भात एक एक निवेदन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या प्रबंधक श्रीमती नीती सरकार यांना देण्यात आले असून असून त्यात म्हटले आहे की पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्त मराठवाड्यातून लाखो भाविक पंढरपूर येथे जात असतात दिनांक २० जून ते २६ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ही यात्रा सुरू आहे.

या काळात औरंगाबाद -पंढरपूर ,अकोला- पंढरपूर आणि आदीलाबाद- पंढरपूर अशा तीन विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात याव्यात तसेच नियमित निजामबाद पंढरपूर गाडीला पाच अतिरिक्त डबे या काळात जोडण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे या निवे या निवेदनावर मराठवाड्यातील प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रितेश जैन, डॉ. राजगोपाल कलानी बाळासाहेब देशमुख, शिवलिंग बोधने, माणिक शिंदे बलसेकर , कदिरलाला हाशमी, दत्तात्रय कराळे, विठ्ठल काळे, रुस्तुम कदम ,दयानंद दीक्षित,श्रीकांत गडापा आदींनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या