🌟दैनिक दिलासाचा ‘दिपत्कार’ दिवाळी अंक घरपोच मिळणार......!


🌟दैनिक दिलासाचा ‘दीपत्कार 2023’ या दिवाळी अंकाचे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रकाशन🌟

परभणी (दि.१७ नोव्हेंबर) :  दैनिक दिलासाचा ‘दीपत्कार 2023’ हा यावर्षीचा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक विक्रीस उपलब्ध झाला असून दीडशे रुपये किंमतीचा हा दिवाळी अंक वाचकांना मागणीप्रमाणे घरपोच मिळणार आहे.

             दैनिक दिलासाचा ‘दीपत्कार 2023’ या दिवाळी अंकाचा पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संत, महंत, लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात प्रकाशन समारंभ झाला. ‘सामाजिक स्वास्थ्य’ सर्वसामान्य कुटूंबियांच्या जिव्हाळ्याचा विषय घेवून दिलासा परिवाराने याहीवर्षीच्या दिवाळी अंकातून सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील नव्या व जून्या पिढीतील मान्यवर अभ्यासक, प्रसिध्द लेखक यांचे लेख घेतले आहेत. विशेषतः नव्या पिढीसमोरील आभासी जग, आधुनिक तंत्रज्ञान याबरोबरच सामान्यांच्या जिव्हाळ्याचे माध्यमे, राजकारण, नोकरशाही, आरोग्य, शिक्षण, कृषि, आयात या विषयांबरोबरच सदृढ कुटूंब व्यवस्था, कुटूंबियांचे मानसिक आरोग्य, अध्यात्म आणि समाजस्वास्थ्य, सत्संग या विषांच्या अनुषंगाने मान्यवरांचे सुंदर, अभ्यासपूर्ण विश्‍लेषण करणारे असे लेख वाचकांच्या निश्‍चितच पसंतील उतरतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय संघटनमंत्री दादा लाड, विश्‍व हिंदु परिषदेचे केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेदक (मुंबई), ज्येष्ठ किर्तनकार हभप माधवराव आजेगावकर, प्रसिध्द लेखिका व समुपदेशक डॉ. तेजस्विनी कुलकर्णी (मुंबई), स्थापत्त्य अभियंता शंकर आजेगावकर, दै. दिलासाचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, प्रसिध्द लेखक व विश्‍लेषक देवेंद्र राक्षे (पुणे), राज्याचे सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक तथा विद्या भारतीचे पश्‍चिम क्षेत्र अध्यक्ष लक्ष्मीकांत पांडे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या कोमिओपॅटीक फिजिशियन मेंबर ऑफ बोर्ड स्टडीजच्या डॉ. मंजूषा नरवाडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. हरिभाऊ पाटील, पुणे न्यायालयातील अभियोक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयातील अ‍ॅड. जगदीश पाटील, पत्रकार संतोष धारासूरकर, सौ. अमृता मृगेंद्र जोशी, ग्राफिक्स व्हिडीओ एडीटर सौमित्र धारासूरकर यांचे लेख या दिवाळी अंकात समाविष्ट आहेत.

           दिलासा परिवाराने हा अंक बाजारपेठेत उपलब्ध केला असून 150 रुपये किंमतीच्या या अंकाची वाचकांनी नोंदणी केल्यास तो घरपोचही दिला जाणार आहे. संबंधितांनी 9881300515 किंवा 9420878333 या क्रमांकावर संपर्क साधावा....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या