🌟व्हॉईस🎤 ऑफ मीडिया अधिवेशन:नवीन ऊर्जा आणि प्रेरणा....!


🌟पत्रकारांच्या आधीच एकूण 130 संघटना आपल्या देशात अस्तित्वात असताना देखील पत्रकांचे प्रश्न सुटलेत का ?🌟


                                           
भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता.आणि त्यामुळे पत्रकार यांचे कडे समाजात आदराने पाहिले जाते.पण या क्षेत्रात अलीकडच्या काळात आलेली नकारात्मकता आणि अपप्रवृत्ती मुळे पत्रकारांची डागाळलेली प्रतिमा हेही एक दुर्दैवी वास्तव आहे.पण एकीकडे समाजाला न्याय देण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांचे जीवनात आज अनेक प्रश्न व समस्या आधीपासूनच आणि नव्याने निर्माण झालेल्या आहेत.अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांच्या आधीच एकूण 130 संघटना आपल्या देशात अस्तित्वात असताना देखील पत्रकांचे प्रश्न सुटलेत का ? याचे उत्तर शोधले तर ते नाही असे आहे.याचा अर्थ इतर संघटनांना बिलकुल दोष नाही.कारण यश अपयश याची अनेक कारणे असू शकतात.परंतु  समस्या कायम असतील तर त्या सुटल्या पाहिजेत आणि आपल्या पत्रकार बांधवांसाठी काहीतरी चांगलं घडाव यासाठी ज्येष्ठ पत्रकार आदरणीय संदीप काळे सर यांनी व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या 131 व्या संघटनेला जन्म दिला.आणि अगदी वर्ष दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेचा नारा,झंझावात अगदी महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशभर जाऊन पोहोचला आहे.आणि आजतागायत जवळपास 38 हजार इतकी मोठी सदस्य संख्या असलेली ही संघटना बनली आहे.तिच्या वेगवेगळ्या शाखा आहेत.जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि संघटनेचे *राज्य उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक सुरेशजी उज्जैनवाल सर,जिल्हाध्यक्ष दिगंबर महाले सर आणि रावेर तालुक्याचे सल्लागार दिलीप वैद्य सर यांचे मार्गदर्शनाखाली या संघटनेचा जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्य करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो.                           

 या संघटनेत जॉईन होताना सुरुवातीला असेच वाटले की पत्रकारांच्या शंभर पेक्षा जास्त इतर संघटना जश्या आहेत तशीच ही पण असेल त्यात नवीन काय असेल.असा माझा समज होता.पण हा समज पुढील काही दिवसातच दूर झाला.हाच समज आपल्या पैकी कोणाचा असेल तर तो डोक्यातून काढून टाका.कारण या संघटनेने पत्रकारांच्या ज्या समस्यांना हात घातलेला आहे त्या त्या समस्या या पत्रकारांच्या मूलभूत समस्या आहेत.आणि त्या सोडवण्याचा विडा *आदरणीय संदीप काळे सर* यांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली *प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के सर* आणि संपूर्ण टीमने उचलला आहे. आणि या संघटनेची भव्य दिव्यता आणि ताकद काय आहे ते खऱ्या अर्थाने लक्षात आले ते म्हणजे आपल्या या संघटनेचे बारामती येथे *ता.18 आणि 19 नोहेंबर रोजी पार पडलेक्या राज्यस्तरीय अधिवेशन निमित्ताने.*                        पत्रकारांना समाजामध्ये एकीकडे मानाचे स्थान असले तरी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये मात्र अनेक समस्या आहेत.कारण वृत्तपत्रांमध्ये संपादकीय विभागात काम करणाऱ्या संपादक उपसंपादक यांना फार काही जास्त वेतन मिळत नाही.कोरोना मुळे तर अनेक पत्रकारांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.तर शहरी आणि ग्रामीण भागातील 90 टक्के पत्रकारांना अगदी अल्प असे मानधन मिळते.काहींना ते काहीच मिळत नाही.आणि मग त्यामुळे पत्रकारांच्या जीवनामध्ये सदैव आर्थिक अडचणी या कायम असतात.त्यामुळे त्यांच्या *मुलांचे शिक्षण,कुटुंबाचे आरोग्य,घरांचा प्रश्न,पत्रकारांवर होणारे जीवघेणे  हल्ले,अधिस्वीकृती,रेल्वे आणि बस प्रवास,आदी.अनेक समस्या भेडसावत असतात.* भारताला स्वतंत्र होऊन 75 पेक्षा जास्त वर्ष झाली.पण समाजातील अन्यायाला आणि समस्यांना वाचा फोडून इतरांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणाऱ्या पत्रकारांच्या जीवनात मात्र अंधार हा कायम आहे.आणि हाच कळीचा मुद्दा दृष्टीसमोर ठेवून *आदरणीय संदीप काळे सर* यांनी व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे बीज रोवले.आणि हे बीज आता मोठा कल्पवृक्ष,वटवृक्ष बनला आहे.ज्या उद्देश्यपूर्तीसाठी ही संघटना उदयास आली ते उद्देश्य केवळ कागदावर न राहता आता प्रत्यक्ष रूपात हळूहळू कृती मधे येऊ पाहत आहे.हे अधिवेशनाच्या निमित्ताने पुढे आले.आज 38 हजार सदस्य संख्या असलेली ही संघटना संस्था येत्या काही काळात लाखाच्या वर सदस्य संख्या पोहोचेल यात माझ्या मनात तर तिळमात्र शंका नाही.आणि आपल्याही मनात ती नसावी.                                              *अधिवेशनातून नवी ऊर्जा आणि प्रेरणाच*                                          दिवाळी नुकतीच आटोपलेली होती.तरीपण पाडवा,भाऊबीज आणि पाहुण्यांचे येणे जाणे या गोष्टी आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये होत्याच.आणि अशातच आपले हे राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले.अर्थात ते आत्ताच याच काळात घेण्यामध्ये आपल्या संघटनेचे वरिष्ठ नेते पदाधिकारी यांचा नक्कीच काहीतरी शुद्ध हेतू असावा यात शंकाच नाही.त्यामुळे सणासुदीच्या काळात आपला नोकरी व्यवसाय सांभाळून आणि आपल्या कुटुंबामध्ये नातेवाईक यांच्या गाठीभेटी चे महत्व असताना आपण सारेच अधिवेशनासाठी 400 /500 / 600 किलोमीटरचा प्रवास करून रात्री बेरात्री बारामती येथे पोहचलो.तसेच *मी प्रवीण पाटील,दिलीप वैद्य सर मिलिंद टोके,पंकज पाटील,पिंटू कुलकर्णी,रवींद्र महाजन,* आम्ही देखील पोहचलो.आणि आपला हा निर्णय किती योग्य होता हे अधिवेशनाच्या यशस्वीतेवरून लक्षात आले.किंबहुना हे अधिवेशन आपल्यासाठीच होते हा विश्वास दृढ झाला.  जसा दिवाळी सण हा आपल्यासाठी होता तसा तो आपल्या संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासाठी सुद्धा होताच की.पण अधिवेशन यशस्वी होण्यासाठी ते आपलं घरदार कुटुंब सोडून बारामती मध्ये गेल्या काही दिवसापासून तळ मुक्काम ठोकून होते.हा त्यांचा मोठा त्यागच आहे.आणि हा त्या केवळ आपल्यासाठीच आहे.आपल्या अधिवेशनाला राजकीय क्षेत्रातील माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब,सुशील कुमार शिंदे साहेब,पृथ्वीराज चव्हाण साहेब, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, हायटेक चे अध्यक्षा सौ.सुनेत्रा ताई अजित पवार,गोदावरी समूहाच्या राजश्री पाटील,खासदार हेमंत पाटील,ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर,कुमार सप्तर्षी,जयश्री खाडिलकर,प्रकाश पोहरे,संजय आवटे,आदी.यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन हे मोलाचे ठरले.तर या अधिवेशनातील एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अल्पावधीतच मोठे स्वरूप प्राप्त केलेल्या आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष *आदरणीय संदीप काळे सर* कर्तुत्वाने आणि पदाने खूप मोठे आणि असामान्य व्यक्तिमत्व असताना ते स्वतःहून कधीही व्यासपीठावर बसले नाहीत.तर त्यांनी अगदी व्यासपीठाच्या समोर असलेल्या श्रोत्यांमध्ये अर्थात आपल्या पत्रकारांमध्ये जाऊन बसून अधिवेशनातील नियोजन आणि बारकावे शोधले.दोन दिवसाच्या या अधिवेशनामध्ये अगदी खूप कमी वेळा आणि तेही त्यांना ज्यावेळी बोलावले त्याच वेळी ते व्यासपीठावर काही वेळच पाहायला मिळाले.यामुळेच त्यांच्या कार्याची उंची किती मोठी आहे.आणि यावरून लक्षात आले की ही संघटना एवढ्या कमी काळात कशी मोठी झाली.*संदीप सर* यांना पदाचा कोणताही गर्व आणि अभिमान आहे असं त्यांच्या वागण्यातून किंचितही पाहायला मिळाले नाही.त्यांना त्यांचे कौतुक करणे अजिबात आवडत नाही.कारण अधिवेशनामध्ये काही पत्रकार बांधवांनी त्यांचे कौतुक केले आणि सर खरोखरच कौतुकास पात्र आहेतच.तरी पण त्यांनी सांगितले माझे कौतुक करू नका कारण मी एकटा काहीच करू शकत नाही.आपण सोबत आहात म्हणून शक्य होत आहे.आणि त्यांनी मी एकटा नाही तर संघटना मोठी आहे. आणि त्यांनी संघटनेसाठी नवीन घोषवाक्य दिले ते म्हणजे *कौतुक नव्हे योगदान हवे* पण मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आदरणीय संदीप सर आपण कितीही म्हटले आणि टाळले तरी आपल्या कौतुका शिवाय आपल्या संघटने संदर्भातील लिखाण पूर्ण होऊ शकत नाही.जसे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शिलेदार मावळे होते.तसेच आपण देखील आपल्या संघटनेचे छत्रपती आहात आणि आम्ही आपले मावळे.आपण जो आदेश द्याल जी सूचना द्याल ती शिरसावद्य मानून संघटनेसाठी काम करू असा शब्द आणि विश्वास देतो.                           

संदीप सर यांनी महाराष्ट्रातून हजाराच्या संख्येने बारामती येथे आलेल्या आणि शक्य होईल तितक्या पत्रकारांची अगदी मनापासून चौकशी केली.आपला प्रवास कसा झाला यापासून तर पत्रकारांची राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सर्व गोष्टी अगदी उत्तमच. आपल्या कडे आलेल्या पाहुण्यांच स्वागत,सन्मान आणि पाहुणचार काय असतो हे तर बारामतीकर यांच्याकडूनच शिकाव. बारामती मध्ये पाय ठेवल्यापासून ते परतीच्या प्रवासाला निघण्यापर्यंत आलेल्या सर्व पत्रकारांची राहण्याची व्यवस्था,सोय सार काही अती उत्तमच होत, कुटुंबापासून दोन-तीन दिवस लांब राहून या अधिवेशनासाठी दिलेला आपला वेळ हा नक्कीच सत्कारणी लागला आहे. या अधिवेशनातून खूप काही शिकायला मिळालं.तर त्यासोबतच संघटनेत काम करण्यासाठी नव्याने जिद्द,चिकाटी, उमेद,ताकद,ऊर्जा आणि प्रेरणा नक्कीच मिळाली आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया म्हणजे काय तर व्हाईस ऑफ इंडिया, अर्थात इंडियाचा आवाज भारताचा आवाजच संदीप सर आणि संपूर्ण व्हॉईस ऑफ मीडिया टीमचे मनापासून धन्यवाद

        ✍🏻प्रवीण पाटील सकाळ बातमीदार सावदा

 उपाध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडिया, रावेर तालुका

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या