🌟असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे🌟
परभणी : ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी 12 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत 2021-22 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून लाभार्थी निवड करण्यात येते. अर्जदारास दरवर्षी नव्याने अर्ज करावा लागू नये यासाठी पाच वर्षापर्यंत प्रतीक्षा यादी लागू केली आहे. त्यामुळे अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याचे प्रतीक्षा यादी क्रमांकानुसार लाभ मिळण्याबाबतचा अंदाज येत आहे.
राज्य व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट, वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षाच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप 25+3 तलंगा गट वाटप योजनेसाठी निवड प्रक्रिया यंदा राबविली जाणार आहे. तसेच पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी अर्ज करण्याची निवड सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर आणि अँड्रॉईड मोबाईल अॅप्लिकेशनच्या AH.MAHABMS (Google play स्टोअरवरील मोबाईल अॅप) वर 12 डिसेंबर 2023 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 1962 किंवा 1800-233-0418 या नि:शुल्क क्रमांकावर तसेच पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.....
0 टिप्पण्या